Scientific Reasons Behind Makar Sankranti : भारतात लवकरच वर्षातील पहिला सण ‘मकर संक्राती’ (Makar Sankranti) साजरा होईल. यावर्षी हा सण 15 जानेवारी रोजी आला आहे. हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून या सणाकडे पहिले जाते. मकर राशीत सूर्याचे आगमन झाल्यावर उत्तरायणात पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला होता. तसेच याच दिवशी देवीने संकारासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. संक्रांत साजरी करण्यामागची ही काही धार्मिक कारणे, मात्र तुम्हास माहित आहे, संक्रांती साजरी करण्यामागे अनेक वैज्ञानिक कारणेदेखील आहेत. संक्रांतीचा काळ हा आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम काळ मानला गेला आहे. त्यामुळे या काळात भरपूर खावे प्यावे ज्याचा फायदा शरीर हेल्दी ठेवण्यास होतो. चला तर पाहूया काय आहे संक्रांतीमागची वैज्ञानिक करणे.
> संक्रांतीच्या काळात नद्यांमध्ये बाष्पीभवनाची क्रिया सुरु होते. यावेळी नद्यांमध्ये स्नान केल्याने शरीराचे आजार बरे होतात, म्हणून या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व आहे.
> संक्रांतीच्या काळात बाहेर थंडी असते, त्यामुळे तीळ आणि गुळाचे सेवन करावे. तीळ आणि गुळ हे गरम पदार्थ असल्याने, या पदार्थांमुळे शरीरात उर्जा निर्माण होते. ही उर्जा तुमचे थंडीपासून संरक्षण करते. या मोसमात तिळगूळ खाल्ल्याने सर्दी-खोकला या आजारांना आराम मिळतो. तीळ शरीरात आढळणारे जिवाणू आणि कीटक नष्ट करते. (हेही वाचा : जाणून घ्या भोगी, संक्रांत आणि किंक्रांत अशा तीनही दिवसांचे महत्व)
> संक्रांती सणादरम्यान खिचडीचे सेवन करण्यामागेदेखील एक वैज्ञानिक कारण आहे. खिचडी पचन क्रिया सुरळीत ठेवते. यात आले, वाटणे मिसळल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
> सूर्याच्या उत्तरायणापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होते. सूर्याच्या प्रकाश जास्त वेळ असल्याने मानवाच्या एनर्जीमध्येही वाढ होते. तसेच मनुष्याची काम करण्याची शक्तीदेखील वाढते.
> मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे. शास्त्रीय दृष्ट्या संक्रांत हा ऋतूबदलाचा काळ मानला जातो ज्यामध्ये हिवाळा ऋतू संपून वसंत ऋतू म्हणजेच एका अर्थाने कापणीचा हंगाम सुरु होतो. यावेळी शेतात निघणाऱ्या पौष्टिक गोष्टींचा आपल्या आहारात समावेश केला जातो. जेणेकरून दिवसभर काम करण्यास आपल्या शरीरात शक्ती निर्माण राहील. यासाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा फक्कड बेत आखला जातो.