Wedding Invitation Card: लग्नाच्या तयारी पासून ते लग्न होईपर्यंत फार गडबड पाहायला मिळते. मात्र या गडबडीत काही वेळेस बऱ्याच गोष्टी राहून जातात. शेवटी गडबडीत चुका होण्याची फार शक्यता असते. मात्र लग्नाचे कार्ड हे खूप महत्वाचे असून त्यामधून आमंत्रण देण्याची पद्धत आहे. तर लग्नपत्रिकेच्या डिझाईनमधील काही चुका ती लग्न पत्रिका छापून आल्यावर कळतात. त्यामुळे लग्नपत्रिकेच्या बाबतीत 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा.
चुकीच्या पद्धतीने टायपिंग
लग्नाच्या कार्डसाठी गडद रंगांचा वापर करणे टाळावे. तसेच कार्डवर लिहण्यासाठी जो मजकुर ठरविला आहे तो पुन्हा एकदा तपासून पाहावा. तसेच त्यामधील शब्दांमधील अंतर, शब्दांच्या चुका आणि व्याकरण यांचे बारकाईने निरिक्षण करावे.
कमी शब्द, आकर्षक लूक
मोजकेपणा आणि आकर्षक लूक हे फक्त फॅशनच्या बाबतीत समीकरण जुळते असे नाही. तर लग्नपत्रिकेच्या डिझाईनमध्ये कमी शब्द आणि शब्दांसाठी वापरले जाणारे फॉंट यांची नीट मांडणी करावी. त्यामुळे लग्नाचे कार्ड आकर्षक दिसते.
लग्नपत्रिकेच्या डिझाईनसाठी थीम वापरणे टाळावे
आजकाल थीम वेडिंगची पद्धत लोकांच्या पसंतीस पडत आहे. परंतु लग्नाचे कार्ड आणि थीम वेडिंगची पद्धत या दोन गोष्टींना एकमेकांपासू दूर ठेवावे. तर भारतीय परंपरेच्या नागरिकांना लग्नाच्या कार्डमध्ये सर्वांचा मान राखून त्याचा मजकूर लिहायचा असतो. त्यामुळे थीम कार्डचा वापर करणे टाळावा.
भाषा
लग्नपत्रिकेवरील भाषा ही फार महत्वाची ठरते. प्रत्येक व्यक्तीला तुमची बोलीभाषा माहिती असेल असे नाही. त्यामुळे जी भाषा सर्वांना समजू शकेल अशा पद्धतीची ठेवावी.