Sex Tips: पहिल्यांदा सेक्स करताना फोरप्ले करणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या महिलांच्या शरीराच्या त्या '5' संवेदनशील जागा
Sex (Photo Credits: Instagram)

पहिल्यांदा सेक्स करणे हा अनुभव प्रत्येकासाठी खूप खास असतो. विशेषत: लग्नानंतर तुम्ही पहिल्यांदा आपल्या जोडीदारासोबत सेक्स (Sex) करत असाल तर तुम्हाला एकमेकांविषयी, त्यांच्या भावनांविषयी जाण असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आपल्या जोडीदाराची इच्छा नसताना सेक्स केल्यास कदाचित त्या जोडप्याची निराशाही होऊ शकते. सेक्स करताना महिलांच्या तुलनेत पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात. मात्र महिलांना उत्तेजित होण्यास थोडा वेळ लागतो. अशा वेळी प्रत्येक स्त्री ची अशी इच्छा असते की तिच्या जोडीदाराने तिचा, तिच्या भावनांचा आदर ठेवून तिच्या मनाप्रमाणे, अपेक्षेप्रमाणे तिच्याशी शारीरिक संबंध ठेवावे.

त्यामुळे अशावेळी पुरुषांनी अतिघाई न करता योग्य त्या पद्धतीने महिलांना उत्तेजित केल्यास त्यांनाही सेक्स चा आनंद घेता येतो. अशा वेळी कामी येते ते फोर प्ले करणे. फोर प्ले करणे म्हणजे आपल्या जोडीदाराना काही पद्धतींनी उत्तेजित करुन तिला सेक्स साठी उत्तेजित करणे आहे. महिलांचे सौंदर्य, त्यांचा कमनीय बांधा पाहून पुरुषांचे स्वत:वर ताबा राहत नाही. अशा वेळी आपल्या महिला जोडीदाराला ही आपल्याप्रमाणेचे सेक्सची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी पुरुषांनी महिलांच्या शरीराच्या त्या '5' संवेदनशील जागांवर फोरप्ले केला पाहिजे.

जाणून घेऊया त्या '5' जागांविषयी:

1. गळा

स्त्री चा गळा हा देखील तिच्या सौंदर्याची खरी ओळख असतो. त्यामुळे गळ्यावर हळूवारपणे चुंबन घेऊन आपण त्यांना उत्तेजित करु शकतो.

2. कान

कानांचे चुंबन घेणे हा देखील फोरप्ले चा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे महिला ब-याचदा उत्तेजित होतात. Sex Tips During Periods: मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स करण्यापासून अडवतायत का 'हे' प्रश्न? जाणून घ्या पिरयेड सेक्सचे फायदे आणि टिप्स

3. स्तन

महिलांचे स्तन हा देखील त्यांच्या सौंदर्याचा एक भाग असतो. त्यामुळे आपल्या महिला जोडीदाराला उत्तेजित करण्यासाठी तुम्ही तिच्या स्तनांना मसाज करणे त्यांचे चुंबन घेऊन देखील त्यांना उत्तेजित करु शकता.

4. ओठांवर चुंबन

सेक्स करताना आपण ब-याचदा ओठांपासूनच सुरुवात करतो. ओठांवरचे चुंबन खूपच खास आणि खास व्यक्तीसाठी असते. त्यामुळे आपल्या जोडीदारासोबत सेक्स करताना तुम्ही महिला जोडीदाराच्या ओठांचे चुंबन घेऊन त्यांना सेक्ससाठी उत्तेजित करु शकतात.

5. महिलांच्या योनीवर मसाज करणे

पहिल्यांदा सेक्स करताना पुरुषांनी अतिघाई न करता आपले शिश्न महिलेच्या योनीत घालण्याचा प्रयत्न करु नये. त्यासाठी पुरुषाने महिलेच्या योनीवर हलक्या हातांनी थोडा मसाज करावा. आणि ती जागा थोडी ओलसर झाली की महिलाही उत्तेजित होतात.

फोर प्ले चा अनुभव हा सेक्स पेक्षाही खूप सुंदर आणि रोमँटिक असतो. मात्र तो योग्य पद्धतीने न झाल्यास तुम्हाला सेक्सचा चांगला अनुभवही घेता येत नाही. म्हणून कधीही सेक्स करण्याआधी जमेल तितके फोरप्ले करणे जरुरीचे आहे.