प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: stokpic/pixabay)

वजन कमी करण्याच्या (Weight Loss)  विचाराला आता जागतिक चिंतेचा विषय म्हटल्यास काही अतिशयोक्ती होणार नाही. आहारातील अनियमितता, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना अतिवजनाची समस्या भेडसावत असते. हे वाढलेले वजन घटवण्यासाठी लोक वाटेल त्या शक्कला लढवतात. पण यापुढे वजन कमी करण्यासाठी ना तुम्हाला तास न् तास जिममध्ये घाम गाळण्याची गरज आहे ना कोणतेही केमिकल औषध घेण्याची, यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरची मदत घेऊ शकता. होय, अभ्यासकांनुसार तुमच्या सेक्स लाईफ मध्ये काही खास पोझिशन (Sex Positions)  करून पाहिल्यास वजन घटण्यास फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे.

आजवर झालेल्या अनेक शोधांमध्ये हे प्रकर्षाने आढळून आले आहे की, साधारणतः एक कपल एका वेळेस 19 ते 20 मिनिटे सेक्स करू शकतं. या वेळेत पुरुषाच्या शरीरातील 101 कॅलरी बर्न होऊ शकतात, तर महिलेच्या शरीरातील 70 कॅलरी बर्न होतात. याउलट ट्रेडमिलमध्ये पुरुषांच्या केवळ 9.2 कॅलरीज तर महिलेच्या 7.1 कॅलरीज बर्न होतात. सेक्स करताना घाई नको; प्रणयापूर्वी जोडीदाराचे इरॉटिक पॉइंटस शोधून अशी करा सुरुवात

चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पोझिशन मध्ये सेक्स केल्यावर वजन कमी करण्यात येते गती...

डॉगी स्टाइल (Doggy Style)

या स्थितीत शरीरातील सर्व अवयव सक्रिय असतात.त्यामुळे या पद्धतीने सेक्स केल्यास पुरुषांच्या खांदे,आणि दंड दणकट होतात तर पोट, मांड्या आणि कंबरेजवळील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते.तर महिलेच्या छातीला सुडौल आकार येतो. सेक्स मधील अनेक पोझिशन्स मध्ये सर्वाधिक आनंद मिळवण्यासाठी तसेच वजन घटवण्यासाठी डॉगी स्टाईल खूपच फायदेशीर ठरते.

काउगर्ल (Cow Girl)

या पोझिशन मध्ये महिला एखाद्या घोडेस्वाराप्रमाणे बसलेली असते.यामध्ये महिलेचा सहभाग जास्त असल्याने त्यांना अधिक फायदा होतो. यामध्ये तुमच्या पोटाच्या खालील भागावर तणाव पडल्याने Core Strength वाढण्यास मदत होते.

(हेही वाचा :  शारीरिक संबंधावेळी करू नका या चुका, नाहीतर पत्नी होऊ शकते नाराज)

लोटस (Lotus)

या पोझिशन मध्ये आपल्या पार्टनरच्या समोरासमोर बसून सेक्स केला जातो, यावेळी शरीराचे संतुलन टिकवून ठेवणे गरजेचे असते, त्यामुळे कंबर व पाठीच्या मणक्यांवर दबाव पडतो मात्र यामुळे शरीरात लवचिकता येण्यास मदत होते.

इरॉटिक एंड (Erotic End) 

पार्टनरला एखाद्या ठिकाणी झोपवून सर्क्युलर पद्धतीने हालचाल करावी. यामुळे पाठ, मांड्या, जांघांचा व्यायाम होतो. बोअरिंग झालेल्या Sex Life ला असे बनवा रंगतदार; Kink, Sex Toys चाही होईल फायदा

 

मॉडिफाइड मिशनरी (Modified Missionary) 

मिशनरी ही खरतर अतिशय जुनी आणि नेहमीची पद्धत आहे यामुळे तुम्हाला थ्रील अनुभवता येणार नाही पण, यात थोडा बदल केल्यास याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो. या पोझिशन मध्ये महिलेने आपल्या पायानी पुरुषाच्या पाठीला गुंडाळावे, सुरवातीला या पोझिशन मध्ये सेक्स करून थोड्यावेळाने बदल करत राहावा. यामध्ये पुरुषांच्या खांद्यांची ताकद वाढते तर महिलेच्या पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

'Dr Felix’ Sex Workout Calculator' (https://www.drfelix.co.uk/sex-workout-calculator/) या साईट वर तुमच्या शरीराच्या वजनाप्रमाणे तसेच सेक्सच्या कालावधीनुसार तुम्ही करून अधिक फायदा मिळतो याचा व्यक्तिगत आढावा दिला जातो, त्यामुळे अधिक माहितीसाठी ही वेबसाईट तपासून पाहा.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)