बोअरिंग झालेल्या Sex Life ला असे बनवा रंगतदार; Kink, Sex Toys चाही होईल फायदा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

एक ठराविक प्रकारचे जेवण रोज रोज खाल्ल्याने बोअर होते, अथवा जिभेची चव बदलावी यासाठी काही नवे खावे अशी इच्छा होते; असेच सेक्सचेही (Sex) आहे. सेक्समध्ये तोच तोचपणा आला की, माणसाची सेक्स करण्याची इच्छा मरते आणि त्याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो. नाते वृद्धिंगत करण्यासाठी सेक्स किती महत्वाचा आहे हे आपण जाणताच, म्हणूनच नात्याला कितीही वर्षे झाली तरी सेक्समधील चार्म टिकवून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी काही सोप्या टिप्सचा फायदा होऊ शकतो.

  • पार्टनरशी बोला – सेक्समध्ये आपल्या पार्टनरला काय हवे आहे, किंवा आपण कुठे कमी पडतोय का याबाबत आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. सेक्स लाईफमध्ये बदल करण्यासाठी काय करायला हवे याबाबत चर्चा करा. (हेही वाचा: भरपूर सेक्स करूनही का राहतात स्त्रिया असंतुष्ट? कदाचित पुरुषांकडून होत असतील 'या' चुका)
  • स्वतःकडे लक्ष द्या – आपल्या जोडीदाराला आकर्षित करून घेण्यासाठी शक्यतो व्यवस्थित, टिप टॉप राहायचा प्रयत्न करा. आपल्या पेहारावामध्ये थोडेफार बदल करा. लक्षात घ्या पुरुषांना स्त्रीला मादक कपड्यांमध्ये पाहायला आवडते, यामुळे त्याच्या मनात सेक्सच्या भावना निर्माण होतात.
  • गोष्टी एकत्र करा – सेक्स लाईफचा चार्म परत मिळवण्यासाठी एकमेकांसोबत एकांतात वेळ व्यतीत करा. अशावेळी रोमान्स, अडल्ट फिल्म्स पाहणे किंवाअडल्ट पुस्तके वाचणे अशी कामे करा.
  • पोझिशन बदला - तुम्ही एकाच पोझिशन्समध्ये सेक्स करत राहिलात, तर तुम्हाला एका काळानंतर सेक्स करण्यात मजा येणार नाही. त्यामुळे नेहमी आपल्या जोडीदाराचा कम्फर्ट लक्षात घेऊन सेक्स पोझिशन बदलत राहा. (हेही वाचा: सेक्समध्ये या आहेत महिलांच्या काही आवडत्या पोझिशन्स; ट्राय करण्याआधी खबरदारी नक्की घ्या)
  • सेक्सची जागा बदला – सेक्स ही फक्त बेडरूममध्येच करायला हवी ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. कधीतरी बेडरूम ऐवजी घराच्या इतर भागांत सेक्स ट्राय करा, आणि पहा एक वेगळीच मजा प्राप्त होईल.
  • अॅडचेंचर – काहीवेळा आपण नेहमी करत असलेल्या गोष्टींपेक्षा वेगळ्या ट्राय करणे फायद्याचे ठरू शकते. पॉर्न व्हिडिओमध्ये दाखवतात त्यातील प्रत्येक गोष्ट खरी असते असे नाही, मात्र त्यातील काही गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. किंकी सेक्स, सेक्स टॉईज अशा गोष्टी नेहमीच सेक्समध्ये अॅडचेंचर घेऊन येतात.