पती पत्नीमध्ये त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालण्यासाठी शारीरिक संबंध म्हणजेच 'सेक्स' फार महत्वाचा आहे. यामुळेच दोघांच्या नात्याचे आयुष्य वाढण्यास मदत होते. सेक्सवेळी साधारण पुरुष स्त्रीवर हावी होतो. मात्र स्त्रियांच्याही अनेक इच्छा असतात, त्या दाबून राहतात. ज्याचा परिणाम म्हणून स्त्रियांची चीडचीड वाढते. त्यामुळे सेक्सदरम्यान दोघांच्याही आवडीनिवडीचा विचार करणे महत्वाचे आहे. यामध्ये तुमच्या सेक्स पोझिशन्स (Sex Position), इरॉटिक पॉइंटस (Erogenous Zones) फार महत्वाची भूमिका बजावतात. पुरुषांचे ऑरगॅझम विर्यपतनाने होते तसेच स्त्रियांचे होतेच असे नाही, त्यांच्यासाठी उत्तेजना महत्वाची आहे. ती कशी आणायची हे तुम्हाला स्वतःला ठरवायला पाहिजे. यासाठी या काही टिप्स फॉलो करू शकता.
> महिलांची सेक्सची इच्छा ही नेहमीच पुरूषांपेक्षा दुप्पट असल्याचे संशोधनात समोर आले आहे. स्त्रिया सेक्समध्ये फक्त 'त्या' मुख्य गोष्टीतूनच संतुष्ट होतात असे अजिबात नाही. तर चुंबन किंवा इतरही कामक्रिडेतून त्या संतुष्ट होऊ शकतात.
> सेक्समध्ये अशी कोणतीच क्रिया अथवा पोझिशन नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. सगळ्याच मुलींना सेक्समध्ये कशात आनंद मिळेल असे सरसकट उत्तर देणे अवघड आहे. मात्र फोरप्ले या प्रकाराने स्त्रियांना आनंद मिळतो हे नक्की.
> प्रत्येक व्यक्तीचे काही ‘इरॉटिक पॉइंटस’ असतात. अशा शरीराच्या अवयवांना स्पर्श केला पाहिजे. याला प्रणय किंवा फोअरप्ले म्हणतात. उदा. महिला नाभीला केलेल्या स्पर्शाने उत्तेजित होऊ शकतात.
> स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना मिळू शकते. 'ती' कृती करण्याआधी हळुवारपणे शरीराला स्पर्श करणे, एकमेकांचा सहवास सुखाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे स्त्रीला उत्तेजना प्राप्त होण्यास फार महत्वाचे आहे. (हेही वाचा : शारीरिक संबंधावेळी करू नका या चुका, नाहीतर पत्नी होऊ शकते नाराज)
> स्तनांना स्पर्श केल्याने तसेच स्त्रीच्या योनीमार्गाच्या वर असणाऱ्या क्लिटोरिस या अवयवाला स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुख्य कृतीची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते.
> साधारणपणे 56 टक्के स्त्रिया आणि 42 टक्के पुरुषांना उभा राहून केलेला सेक्स आवडत नाही असे निदर्शनास आले आहे. तसेच बऱ्याच स्त्रियांना ओरल सेक्सदेखील आवडत नाही. त्यामुळे तुमच्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी या गोष्टीही लक्षात ठेवा.