शारीरिक संबंधावेळी करू नका या चुका, नाहीतर पत्नी होऊ शकते नाराज
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

पती आणि पत्नी मधील शारीरिक संबंध (Sex) ही गोष्ट अतिशय संवेदनशील आणि नाजूक गोष्ट आहे. एकमेकांच्या जवळ येण्याचा हा सर्वात योग्य आणि सोपा उपाय आहे. मात्र सेक्सदरम्यान उतावळे पुरुष अनेक चुकीच्या गोष्टी करतात अथवा नको त्यावेळी नको त्या गोष्टी बोलतात. यामुळे त्या क्षणाची मजा निघून जाते आणि त्याचे महत्वही कमी होते. याचसोबत पत्नी नाराज होते ती गोष्ट वेगळी. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. काही गोष्टी न बोलता फक्त तो क्षण अनुभवने गरजेचे आहे. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांमुळे शारीरिक संबंधावेळी पत्नी नाराज होऊ शकते किंवा अशा गोष्टी ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.

शारीरिक संबंध ही एकमेकांच्या कलाने घेतली जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला काय हवे आहे त्यासाठी जबरदस्ती करण्याऐवजी आपल्या पार्टनरला काय हवे आहे हे ओळखून त्यानुसार आपल्या सवयी बदला.

> बऱ्याच मुलींना शारीरिक संबंधावेळी विविध गोष्टी ट्राय करणे आवडते, मात्र त्या ते बोलून दाखवत नाहीत. बरेच पुरुषही अशा गोष्टींकडे कानाडोळा करतात. तुम्हीही असेच करत असाल तर तुमची सवय बदला. सेक्सदरम्यान तुम्ही पुढाकार घेऊन काही नवनवीन गोष्टी करून पहा, ज्यामुळे तुमचा पार्टनर नक्कीच खुश होईल.

> सेक्स करण्यादरम्यानचे निर्णय तुम्ही एकट्याने घेऊ नका. सेक्स ही दोघांनी मिळून अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे आपल्या पार्टनरसमोर थोडे नमते घ्या. कधी कधी तिलाही तुम्हाला डॉमिनेट करू द्या.

> सेक्सदरम्यान पुरुष पार्टनर आपली तारीफ करत नाहीत ही बऱ्याच मुलींची समस्या असते. त्यामुळे सेक्सदरम्यान आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी तिच्या अवयवांची, तिच्या सौंदर्याची तारीफ करा, यामुळे स्त्रियांची उत्तेजना वाढते.

> बऱ्याच स्त्रियांना इंटरकोर्ससोबत फोरप्ले हा प्रकारही आवडतो. भलेही तुम्हाला त्यात स्वारस्य नसेल मात्र आपल्या पार्टनरसाठी तो करा, यामुळे स्त्रिया जास्त उत्तेजित होतात.

> सर्वात महत्वाचे म्हणजे, सेक्स केल्यानंतर लगेच झोपू नका. बरेचदा स्त्रियांच्या आधी पुरुषांना ऑरगॅझम येते, त्यामुळे स्त्रियांच्या भावनांकडे दुर्लक्ष होते. तुम्ही असे करू नका, सेक्स नंतर पार्टनरला फक्त बाहुपाशात घेऊन बसलात, प्रेमाचे दोन शब्द बोलतात तर तिला ते नक्कीच आवडेल.