कोणत्याही गोष्टीचे व्यसन हे तसे वाईटच. त्याच्या आहारी जाणे हे तर आणखीच वाईट. सेक्स अॅडिक्शन (Sex Addiction) हा सुद्धा त्यातलाच भाग. सेक्स अॅडिक्शन ही शारीरिक नव्हे तर, मानसिक समस्या आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण साइकियाट्रिस्ट किंवा साइकोसेक्सुअल कंन्सल्टंटचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतल्याच सेक्स अॅडिक्शन पासून सुटका होऊ शकते. अन्यथा सेक्स अॅडिक्शन आपले मोठे नुकसान (Disadvantages of Sex Addiction) करु शकते.
ज्या लोकांमध्ये सेक्स अॅडिक्शनची समस्या असते ते लोक एकटेपणा, अपुरेपण अनुभवतात. अशा लोकांमध्ये प्रेमभावना कमी होऊन अपराधीपणाही वाढल्याचे पाहायला मिळते. तसेच, हे लोक चिंता, नैराश्य आदींची शिकार झालेले पाहायला मिळतात. अनेकदा त्यांच्या आत्मविश्वासाचाही अभाव जाणवतो. अती तणावात आल्यावर हे लोक इतर व्यसनांच्या आहारी जाण्याचाही संभव असतो. कधी कधी हे लोक अती मध्यपान करतात. (हेही वाचा, Sex Education: सेक्स करण्याची तीव्र इच्छा वारंवार होते? नियंत्रण मिळवायचे आहे?)
सेक्स अॅडीक्ट लोक अनेकदा विविध लोकांशी सेक्स करत असतात. त्यामुळे त्यांना गुप्तरोग, लैंगिक समस्या उद्भवू शकतात. सेक्स अॅडीक्ट व्यक्तीला जर सेक्स करण्यास मिळाला नाही तर ती व्यक्ती चिडचिडा बनते. अनेकदा त्याच्यासोबत व्यवहार करणाऱ्या किंवा त्याच्या जवळच्या लोकांनाही त्याच्या चिडचिडेपणाचे कारण कळत नाही. सेक्स अॅडीक्ट महिलांबाबत एक अहवाला सांगतो की, सेक्स अॅडीक्ट असलेल्या 70 महिलांमागे एक महिला गरोदर राहते.