Sex During Lockdown: कोरोना काळात Masturbation हा सेक्स ड्राईव्ह पुर्ण करण्याचा बेस्ट पर्याय, कॅनडा मधील टॉप डॉक्टरांंचा सल्ला
Masturbation (Photo Credits: Pixabay)

जगभरात कोरोना व्हायरस चे (Coronavirus) थैमान सुरु असताना सोशल डिस्टंंसिंंग (Social Distancing) पाळण्याच्या सुचना वारंवार केल्या जात आहेत.मात्र लोकांंपासुन कितीही लांंब राहिलं तरी सेक्स (Sex)  करताना डिस्टंंसिंग कसं पाळणार असा प्रश्न निर्माण होतोच, हो ना? जगभरातील अनेक सेक्स एक्स्पर्ट्सने याविषयी सल्ले देत कपल्सना गाईड केले आहे. याच पैकी कॅनडा मधील टॉप डॉक्टर थेरेसा टॅम यांंचा सल्ला सध्या चर्चेत आहे. टॅम यांंनी लोकांंना सेक्स ड्राईव्ह (Sex Drive) भागवण्यासाठी हस्तमैथुन (Masturbation) करण्याचा सल्ला दिला आहे. यापुर्वीही झालेल्या एका निरिक्षणात असाच मुद्दा समोर आला होता. लैलो या सेक्स टॉय विकणाऱ्या एका ब्रॅण्डने केलेल्या सर्व्हे मध्ये लॉकडाऊन काळात सेक्स टॉयच्या विक्रीत वाढ होउन अनेकजण हस्तमैथुन/ सेल्फ लव्ह ला प्राधान्य देत आहेत असे समजत होते. Sex मार्फत पसरू शकतो Coronavirus?

डॉ. टॅम यांंच्या माहितीनुसार, वीर्य किंवा योनिमार्गातुन कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. तथापि, अनोळखी व्यक्तींसह सेक्स केल्याने हा धोका वाढतो, सेक्स हा केवळ पेनिट्रेशन पुरताच मर्यादित राहत नाही या मध्ये येणारी जवळीक,किसिंग यामुळे कोरोना पसरण्याचा धोका असतो अशावेळी सुरक्षित पर्याय म्हणुन प्रत्यक्ष सेक्स ऐवजी मास्टरबेशन करणे बेस्ट ठरेल असेही डॉ.टॅम यांंनी म्हंंटले आहे.हे ही वाचा - Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे

दरम्यान, जर का तुम्ही सेक्स करणारच असाल तर किंसिंग करणे टाळा, एकमेकांच्या चेहऱ्याजवळ येणे, तोंड आणि नाक मास्कने झाका, स्वत:ला तपासा आणि पार्टनरला सुद्धा. त्यानंतरच तुम्ही सेक्स संबंधित गोष्टी करु शकता असे ही टॅम यांनी म्हटले आहे.