प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Max Pixel)

सध्या जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असल्याने त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. याच दरम्यान आता कॅनडा (Canada) मधील एका टॉप डॉक्टरांनी नागरिकांना सेक्स करताना मास्क (Use Mask During Sex)  घालण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी असे ही म्हटले आहे की, किसिंग (Kissing ) आणि मास्क न घालता सेक्स (Sex) केल्याने कोरोनाचा संसर्ग पसरला जाऊ शकतो असे बोलले जाण्याची शक्यता कॅनडाच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

डॉ. थेरेसा टॅम (Dr Theresa Tam)  यांनी एका विधानात असे म्हटले की, वीर्य किंवा योनीतून निघणाऱ्या द्रव्यपदार्थातून कोविड19 चा धोका संभवत नाही. परंतु एखाद्या नव्या पार्टनरसोबत तुम्ही लैंगिक संबंध ठेवल्यास तर कोरोना व्हायरसची शक्यता व्यक्त करता येते. त्याचसोबत ज्या वेळी एखादा व्यक्ती चुंबन घेण्यासारखी क्रिया करते त्याच्या माध्यमातून एकमेकांसोबत जवळीक आल्याने कोरोनाचा धोका नाकारता येत नाही. कोरोना व्हारसच्या काळात अशा काही गोष्टी करा जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक कमी असेल.(Sex Positions Guides: जगभरातील कपल्स मध्ये फेमस आहेत या 5 टॉप सेक्स पोझिशन्स, तुम्हीही करु शकता ट्राय)

किंसिंग करणे टाळा, एकमेकांच्या चेहऱ्याजवळ येणे, तोंड आणि नाक मास्कने झाका, स्वत:ला तपासा आणि पार्टनरला सुद्धा. त्यानंतरच तुम्ही सेक्स संबंधित गोष्टी करु शकता असे ही टॅम यांनी म्हटले आहे. परंतु एकट्यानेच सेक्स संबंधित गोष्टी केल्यास त्याचा कोरोनाचा काळात फारसा काही परिणाम होणार नाही आहे. सेक्सुअल हेल्थ हे एकूणच आरोग्यासाठी महत्वाचे आहे. परंतु त्यावेळी काही गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे आहे.

दरम्यान, कॅनडात 1 सप्टेंबर पर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 129,425 वर पोहचला असून 9132 जणांचा बळी गेला आहे. परंतु दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक कमी आहे. मात्र पश्चिम कॅनेडात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वाढ होत आहे.