Relationship Tips: सोशल मीडियात तुमचे प्रेम खुल्या पद्धतीने व्यक्त करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Picture: Pixabay/ @sweeticecreamwedding)

प्रत्येक नात्याची एक वेगळीच ओळख असते. तर समाजाच्या दृष्टीने प्रत्येक नातेसंबंधाचे महत्व जपले जाते. मात्र सध्याच्या बदल्या काळानुसार नातेसंबंध हे खुल्या पद्धतीने स्पष्ट केले जातात. त्यामुळे काही जण आपले जर प्रेमाचे नाते असेल ते खुल्या पद्धतीने सोशल मीडियात व्यक्त करतात. काही जणांना असे करणे आवडते पण काही जण आपले नाते सोशल मीडियात बहुतांश वेळा व्यक्त करत नाहीत. परंतु सोशल मीडियात प्रेमसंबंध खुल्या पद्धतीने सांगणे हे काहीसे कठीण आहे. मात्र तरीही एकदा यासंबंधित आपल्या पार्टनरसोबत बोलून निर्णय घ्या.

तुमच्या पार्टनरला जर सोशल मीडियात रिलेशनशिप खुल्या पद्धतीने सांगतीलेले आवडत असल्यास तर कोणताच प्रश्न उद्भवत नाही. मात्र उलट पार्टनरला ही गोष्ट पसंत नसल्यास मनाविरुद्ध वागून रिलेशनशिप स्टेटस ठेवणे चुकीचे असून नात्यात दूरावा येऊ शकतो. त्याचसोबत रिलेशनशिप खुल्या पद्धतीने सोशल मीडियात सांगितल्यास आपला मित्रपरिवार किंवा घरातील मंडळी काय प्रतिक्रिया देतील याचा सुद्धा विचार करा.(Online Sex Tips: क्वारंटाईनच्या दरम्यान तुमच्या पासून दूर असलेल्या जोडीदारासोबत ऑनलाईन सेक्स डेट कशी कराल?)

 आयुष्यातील काही निर्णयांचा दबाब पार्टनरवर कधीच लादू नका. कारण नात्यात दोघांच्या संमतीने घेतलेले निर्णय फार महत्वाचे असतात. ऐवढेच नाही तर नात्यातील विश्वास हा दोघांमधील प्रमुख धागा असून तो चिरंतर काळ कसा टिकेल याकडे लक्ष द्या. समाजात फक्त प्रेमाचे नाते असल्याचे दाखवण्यासोबत आपल्या पार्टनरचा आदर करा. त्याचसोबत पार्टनरच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला नेहमीच आनंदात कसे ठेवता येईल याचा सुद्धा विचार करा.(53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य)

सध्या सोशल मीडियात रिलेशनशिप स्टेटस ठेवून मोकळे झालेले काही कपल्स नंतर ब्रेकअप झाल्यानंतर पुन्हा आपण सिंगल असल्याचे दाखवून देतात. यामुळे तुमच्या वैयक्तिक स्वभावावर काही वेळा प्रश्च सुद्धा उपस्थित केले जाऊ शकतात. त्यामुळे पार्टनर सोबत तुमचे नाते कितीही घट्ट असले तरीही दोघांमधील काही गोष्टी दोघांतच ठेवल्या तर रिलेशनशिप अधिक काळ टिकू शकते.