Relationship Tips: रिलेशनशिप तुटण्याची सतत भीती वाटत असेल तर 'या' गोष्टींची जरुर काळजी घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Relationship Tips: एखाद्या नात्यात आपण अडकले जातो तेव्हा त्याची बातच निराळी असते. ऐवढेच नव्हे तर बहुतेकजणांना तो/ती आपली परफेक्शनिस्ट असेल असे त्यांना वाटते. परंतु दुसऱ्या बाजूला नात्यात एखाद्या शुल्लक कारणावरुन फुट पडेल म्हणून सतत चिंतेत असतात. मात्र असे तुम्हाला वाटत असेल तर अजिबात घाबरुन जाऊ नका. यावर सरळ आणि सोप्पा उपाय म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास. तोच जर नसेल तर तुमच्या नात्यात दूरावा येण्याची अधिक शक्यता असते.

आपल्या पार्टनर सोबत आपण नेहमी हसत खेळत रहावे असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा तुमच्या एका चुकीमुळे तुमचा पार्टनर दुखावला जाऊन नाते संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर रिलेशनशिप तुटण्याची सतत भीती वाटत असेल तर 'या' गोष्टींची जरुर काळजी घ्या.(डेटिंग नंतर सुद्धा पार्टनरला सोडून का जातात लोक? जाणून घ्या नाते संपुष्टात येण्यामागील कारणे)

जर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल प्रामाणिक नसाल तर ते तुमचे नाते बिघडवू शकते. अशा परिस्थितीत, दीर्घ संबंधांसाठी, एकमेकांशी पूर्णपणे प्रामाणिक रहा. जर कोणी तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास दाखवत असेल तर तो विश्वास प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. तरच तुमचे नाते सखोल आणि मजबूत होईल.

नात्यात असताना अनेक वेळा आपण एकमेकांच्या आवडी -निवडीकडे दुर्लक्ष करायला लागतो. असे केल्याने संबंध बिघडू शकतात. अशा स्थितीत दोघांच्या आवडी -निवडी सारख्याच असाव्यात असे नाही, तर एकमेकांच्या आवडीचा आदर केला पाहिजे.(Women Should Avoid These Mistakes: लग्न झालेल्या स्त्रीने कधीही करू नये 'या' चूका; यामुळे लक्ष्मी रागवू शकते आणि नवऱ्याला ही होऊ शकतो त्रास)

जर तुमच्या नात्यात कम्युनिकेशन गॅप असेल तर ते धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत नातेसंबंध मजबूत ठेवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत जरी तुम्ही व्यस्त असलात तरी तुमच्या जोडीदाराशी बोला आणि सर्वकाही सांगा.