दोन लोकांमध्ये जेव्हा एखादे नाते सुरु होते त्यावेळी काही गोष्टी सुद्धा महत्वाच्या ठरल्या जातात. जसे एकमेकांना वेळ देणे, भावनांचा आदर करणे किंवा एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास. जर या गोष्टी तुमच्या नात्यात परिपूर्ण असतील तर तुमचे नाते दीर्घकाळ टिकते असे म्हटले जाते. नाते कोणतेही असो काही कमेटमेंट्स त्यात येताच. पण काहीजण कमेंटमेंट्स करुन सुद्धा एकमेकांना दुखावताना, दूर जाताना दिसतात. असे का होते? याचे उत्तर तुम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहात का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लोक एकमेकांना डेटिंग केल्यानंतर सुद्धा का सोडून जातात.
आपल्या जवळचा व्यक्ती आपल्याला सोडून गेला की खुप त्रास होतो. त्यावेळी आपल्याला काय करावे, काय करु नये असे होते. सारखी चिंता लागून राहतेच पण आपण त्या परिस्थितीत स्वत:ला सावरणे फार महत्वाचे असते. कारण नात्यात एखाद्या कारणावरुन जर खटके उडाले असतील तर ते दोघांनी मिळून सोडवावेत. नाहीतर नात्यात दूरावा निर्माण होतो.(सेक्स लाइफ उत्तम ठेवायची असेल तर कपल्सने 'या' गोष्टींवर अधिक भर द्यावी)
काही वेळेस असे ही होते की, जेव्हा दोन विविध विचार करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना डेट करु लागतात तेव्हा त्यांच्यामधील संभाषणात सुद्धा बहुतांश वेळा एकमत होत नाही. त्यामुळे डेटिंगच्या सुरुवातीलाच तुमचा पार्टनर कोणत्या विचाराचा आहे याबद्दल जाणून घ्या. असे केल्यास तुम्हाला स्वत:लाच जाणवेल की या पार्टनरस सोबत आपण पुढील आयुष्य काढू शकतो की नाही. काही वेळेस असे ही होते की, वेगवेगळे विचार जरी असले तरीही एकमेकांमध्ये समजूतदारपणा असेल तर नाते टिकू शकते. मात्र नात्यात विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी जरुर घ्या.
एकमेकांना समजून घेतल्यानंतर, खुप वेळ डेट केल्यानंतर जेव्हा कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागते तेव्हा पंचायित होते. तेव्हा पार्टनर आपल्या करियकडे अधिक वळला जातो आणि तो दुसरीकडे जाण्यास ही तयार होतो. पण त्यावेळी जर तुम्ही पार्टनरची गरज समजून न घेतल्यास तुमच्यामधील नाते तुटण्याची अधिक शक्यता असते. एकमेकांपासून जर कामासाठी दूर होत आहात याचा अर्थ असा नव्हे तुमच्यामधील नाते संपुष्टात आले आहे. दोघांनी सुद्धा आपल्या करियरमध्ये प्रगती करुन पुढील आयुष्य किती अधिक सुंदर, सरळ जगता येईल याचा विचार करावा. परंतु हे जर तुमच्या पार्टनरला मान्य नसेल तर अशावेळी लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात.(Reasons Of Less Interest In Sex: सेक्स करण्याची इच्छा का वाटत नाही? जाणून घ्या 5 महत्वपूर्ण कारण)
काही लोकांना एकमेकांना डेट करणे म्हणजे मजेची गोष्ट वाटते. दररोज नव्या लोकांना भेटणे त्यांच्यासोबत मैत्री करणे हे त्यांना आवडत असते. मात्र पण जेव्हा तुम्ही एखाद्या सीरियस रिलेशनशिपमध्ये येता, तेव्हा आपल्या पार्टनरच्या गरजा पूर्ण करणे हे आपले कर्तव्य असते. पण सध्याच्या तरुणाईमध्ये पार्टनरच्या गरजांपेक्षा आपणच किती वरचढ आहोत ते सांगण्याची अधिक हौस असते. अशाने गैरसमज निर्माण होतातच. त्यामुळे एकमेकांनसोबत कमिटेड सुद्धा राहता येत नाही. अशावेळी पार्टनर सोडून गेल्याचे नैराश्य येत काही जणांना येऊन ते टोकाचे सुद्धा पाऊल उचलण्यास मागे पुढे पाहत नाही.
डेटिंग नंतर सुद्धा पार्टनर सोडून जातात यामागे अनेक कारणे असू शकतात. पण तुमचा पार्टनर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला विसरु शकत नसेल तर त्यावेळी समस्या उद्भवू शकतात. काही जण आपल्या एक्स पार्टनरला विसरण्यासाठी एखाद्याला डेट करण्यास सुरुवात करतात. त्यावेळी ते लोक आपल्या भावना ऐवढ्या मोकळेपणाने सांगतात की, तुम्हाल त्यांच्यासोबत रहावे असे वाटते. पण एक्स पार्टनरला विसरुन नव्या नात्यात गोडवा कसा आणायचा हे मात्र तुम्हाला ठरवायचे असते. असे होत नसेल तर तुमचा पार्टनर तुम्हाला वैतागून सोडून जाऊ शकतो.