महिलांचे काही कारणामुळे कोणासोबत भांडण झाल्यास त्याना फार वाईट वाटते. तर काही वेळेस भांडण झालेल्या व्यक्तीपासून आपण विभक्त होत असल्याची भावनासुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होते. तुटलेल्या नात्याला कशा पद्धतीने पुन्हा व्यवस्थित करता येईल याचा प्रयत्न बहुतांश महिलांकडून केला जातो. त्यासाठी महिला सामजस्यांनी उद्भवलेले प्रश्न सोडवण्यासाठी तयार होतात.
त्यामुळेच काही महिला बऱ्याच वेळेस दु:खी असूनही त्या आनंदात असल्याचा भावना इतरांसमोर व्यक्त करतात. मात्र काही महिला या काही काराणांमुळे कोणत्या ना कोणत्या नात्यात राहण्याचा प्रयत्न करतात.
>गोंधळाची स्थिती
मनोवैज्ञानिकांच्या मते शाररिक आणि मानसिक त्रास सहन न झाल्यास काही महिला गोंधळलेल्या स्थितीत दिसून येतात. त्याचसोबत आपल्यासोबत झालेल्या प्रकाराबद्दल स्वत:ला दोषी मानतात. यामुळे त्यांना आपले जीवन अर्थहीन होत असल्याचे वाटते.
>समाजाची भीती
काही महिला समाजाच्या भीतीमुळे हिंसक नात्यामधून बाहेर पडण्याचा विचार करतात. त्याचसोबत आपल्यासोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत सांगण्यात घाबरतात.
>मुलांच्या भविष्याची काळजी
आपल्या देशात सिंगल पॅरेंट्सची जबाबदारी स्विकारणे कठीण असते. अशा परिस्थितीत महिलांवरील जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे मुलांचे भविष्य सुरक्षित कसे ठेवावे याची त्यांना चिंता सतावत राहते.
>आर्थिक स्थिती
काही महिला आर्थिक परिस्थितीमुळे काही खर्च करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे आपल्या जोडीदारावर त्या अवलंबून असतात. तर काही वेळेस जोडीदाराकडून महिलेला त्रास सुद्धा दिला जातो. तरीही त्या काही कारणास्तव जोडीदाराला सोडून जात नाहीत.
तर आजसुद्धा आपल्याकडील समाजात नाती बनवणे सोपे आहे. मात्र त्यांची जबाबदारी स्विकारणे खुप कठीण आहे. त्यामध्ये परिवाराच्या काळजीपोटी काही महिला आपले दुख बाजूला सारुन कोणत्या ना कोणत्या नात्यात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात.