New Year 2019 : 'या' कारणामुळे जगात 1 जानेवारीला नवीन वर्षाचा आनंद साजरा करतात
नवं वर्ष स्वागत (फोटो सौजन्य-Pixabay)

New Year 2019 : घड्याळाचे काटे हळूहळू पुढे सरकत चालले असून अवघ्या काही तासांच्या कालावधी नंतर लोक 2018 या वर्षाला अखेरचा निरोप देणार आहे. तसेच नवं वर्ष म्हणजेच 2019 च्या स्वागतासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर पासूनच लोक नवं वर्ष साजरा करण्याच्या उत्साहात न्हाहून गेलेले दिसून येतात. अशा वेळी देशातील लोक आनंद साजरा करतात किंवा बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. 31 डिसेंबरच्या रात्रीपासूनच सर्वत्र आनंदी वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की जगभरात 1 जानेवारीलाच नवं वर्ष का साजरे केले जाते? जर नाही विचार केला असेल तर जाणून घ्या नवं वर्ष साजरे करण्यामागील मुख्य कारण काय आहे.

नवं वर्ष साजरे करण्यामागील खूप कारणे आहेत. एक जानेवारी पासून सुरु होणाऱ्या दिनदर्शिकेला 'ग्रिगोरियन कॅलेंडर' (Gregorian Calender) म्हटले जाते. या कॅलेंडरची सुरुवात ख्रिस्तियांनी नाताळ साजरा करण्यासाठी ठरविली होती. कारण गिग्रोरियन कॅलेंडरच्या पूर्वी 10 महिने असलेले रुसचे ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते. तर ज्युलियन कॅलेंडरमध्ये नाताळ सण साजरा करण्याची तारीख निश्चित केलेली नव्हती आणि त्यात चुकाही होत्या. (हेही वाचा- New Year's Eve 2018 Google doodle : गूगल डूडलवरही 31 डिसेंबर 2018 च्या नाईट्चं खास सेलिब्रेशन!)

नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा खास सण मानला जात असून ख्रिस्ती धर्मियांचा देवता येशूचा जन्म झाला होता. येशूने लोककल्याणासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले . त्यामुळेच नेपल्सचे फिजीशियन एलॉयसिस लिलिअस यांनी नवीन एक कॅलेंडर उदयास आणले. तसेच रुसच्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर या कॅलेंडरला औपचारिकरित्या रुस यांनी मान्य केले. Happy New Year 2019: नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Messages, Status, GIF Images, Animated Stickers

या कॅलेंडरचा स्विकार करण्याचे आदेश पोप ग्रिगोरी यांनी दिला होता. त्यामुळेच या कॅलेंडरचे नाव ग्रिगोरियन कॅलेंडर असे पडले आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिस्ती. पारसी या सर्व धर्मियांच्या अनुसार नवीन वर्ष 1 जानेवारीला येते. परंतु ग्रिगोरियन कॅलेंडर खूप जगप्रसिद्ध आहे. त्यामुळेच 1 जानेवारीला नव वर्ष म्हणून साजरं केलं जातं.