New Year's Eve 2018 Google doodle : गूगल डूडलवरही 31 डिसेंबर 2018 च्या नाईट्चं खास सेलिब्रेशन!
New Year's Eve Google doodle (Photo Credits: Google)

New Year's Eve 2018  Google doodle : जगभरात नव्या वर्षाच्या (New Year)  स्वागतासाठी लोकं सज्ज झाली आहे.. घरगुती पार्ट्यांपासून ते अगदी धार्मिक ठिकाणी भेट देण्याचे प्लॅन्स ठरले आहेत. लोकांच्या या उत्साहामध्ये इंटरनेटवर अधिराज्य गाजवणारं गूगलदेखील सहभागी झालं आहे. अवघ्या काही तासात आपण 2018 ला अलविदा म्हणतं नव्या वर्षाचं स्वागत करणार आहोत. मग या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच थीमवर आजचं गूगल डूडल (Google doodle) सजलं आहे. दोन चिमुकले हत्ती फुग्यांसोबत खेळत, पॉपकॉर्न खात नव्या वर्षाची वाट पाहत आहेत अशा आशयाचं अ‍ॅनिमेटेड गूगल डूडल आज झळकत आहे.

खास सणांच्या थीमवर किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार्याला अभिवादन म्हणून अनेकदा गूगल डूडल सजलेलं दिसतं. मात्र सध्या नववर्षाच्या सेलिब्रेशन मोडमध्ये असलेल्या युजर्ससाठी गूगलही सज्ज झालं आहे. नववर्षाच्या रात्री 12 च्या ठोक्याला दहा मिनिटं असण्यापूर्वी सेलिब्रेशनची तयारी सुरू असल्याचं गूगल डूडलमध्ये दाखवण्यात आलं आहे. Christmas, New Year च्या विकेंडदरम्यान खाजगी बसभाड्यात 30-50 % वाढ !

जगभरात नववर्षाच्या सुरूवातीला, रात्रीच्या 12 च्या ठोक्याला फटाके उडवून, आतषबाजी करून नववर्षाचं स्वागत केलं जातं. रात्रभर पार्टी करून मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातं. यंदा नववर्षाची सुरूवात विकेंडला जोडूनच आल्याने सारीच पर्यटनस्थळ हाऊसफुल्ल झाली आहेत.