प्रतिकात्मक फोटो (Photo: Pixabay)

Excessive Sleepiness: आपल्या शरिराला पुरेशी झोप घेणं हे महत्त्वाचे असतं. प्रत्येकाने रात्री ७ ते ८ तास झोप घ्यावी असं डॉक्टर सांगतात. परंतु काही जण त्याहून अधिक काळ झोप घेत असतात. शस्त्राज्ञांनी सांगितल्यानुसार, जास्त काळ झोप घेणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. यामुळे दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम पडत असतो. आपल्या शरिरात पोषक तत्वांच्या कमतरेमुळे जास्त झोप येऊ शकते असं डॉक्टर सांगतात. झोप पूर्ण घेतल्यानंतरही तुमचं शरिर थकल्यासारखं वाटत असेल तर समजून घ्या शरिराला पुढील पोषण तत्वांची आवश्यकता आहे. (हेही वाचा- Cancer दूर ठेवण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक पहा अचंबित करणारं हे कनेक्शन काय 

जास्त झोप घेण्याच्या समस्येमागील मुख्य कारण म्हणजे आपल्या शरिरात व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असणे. एवढं नव्हे तर शरिरात लोह आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे देखील जास्त झोप येऊ शकते. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२साठी पुढील पदार्थांचा जेवणात समावेश करा.

व्हिटॅमिन डी- जर शरिरात व्हिटॅमिन डी ची करतरता असेल तर तुम्हाला सतत थकल्या सारखं वाटेल. एवढंच नव्हे तर अशक्तपणा आणि आळशीपणा वाढू शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे, स्नायु दुखतात. व्हिटॅमिन डीचा मुख्य स्रोत हा कोवळा सुर्यप्रकाश आहे. त्यामुळे दररोज सकाळी सुर्यप्रकाश घ्यावा. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यास देखील मदत करते. मशरुम, पालक, केळी आणि संत्री यांचा जेवणात समावेश करा.

व्हिटॅमिन बी 12- आपल्या शरिरासाठी जास्त उपयुक्त ठरतं ते व्हिटॅमिन बी 12. जर शरिरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता जाणवत असेल तर आहारात अंडी,मासे, दूध, काजू, टमॅटो आणि पनीर अश्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन बी 12ची शरिरात कमतरता असेल तर शरिरातील स्नायू कमजोर होतात. याचा परिणाम चेहऱ्यावर देखील होतो, शरिरात अशक्यतपणा वाढतो. शरिर जास्त थकल्यासारखे दिसून येते. त्यामुळे आराहात नेहमी पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा.