World Suicide Prevention Day | (Photo Credits: PixaBay)

World Suicide Prevention Day 2019: जगभरातील आत्महत्येच्या घटना विचारात घेऊन त्याला प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, आत्महत्या करणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या मोठी आहे. एक अहवाल सांगतो की, जगभरात तब्बल 8 लाख लोक आत्महत्या केल्याने मृत्यू पावतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (World Health Organization) नेटवर्क ऑन सुइसाइड रिसर्च अॅण्ड प्रिवेन्शन (Suicide Research and Prevention) यांच्या आकडेवारीनुसार भारतात प्रति वर्ष तब्बल 2.3 लाख लोक आत्महत्या करतात. तर, एक आकडेवारी असेही सांगते की, आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत आघाडीवर आहे.

जगभरात प्रतिदिन सरासरी 3000 लोक आत्महत्या करतात

जागतिक आरोग्य संघटना (WHO) सांगते की, जगभरात सरासरी 3000 लोक आत्महत्या करतात. तर, जवळपास 20 हजार किंवा त्यापेक्षाही अधिक लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. प्रतिवर्ष सादारण एक मिलियन लोक आत्महत्या केल्याने मृत्यू पावतात. हे प्रमाण विचारात घेऊनच 2003 मध्ये पहिल्यांदा जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिन सुरु करण्यात आला. तेव्हापासून 10 सप्टेंबर हा दिवस आत्महत्या प्रतिबंद दिवस पाळला जातो. हा दिवस सुरुवातीला आयएएसपीच्या स्वरुपात होता. पुढे जागतिक आरोग्य संघटनेद्वारे याचे आयोजन केले जाऊ लागले.

महिलांच्या तुलनेत आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या अधिक

आकडेवारी सांगते की, महिलांच्या तुलनेत आत्महत्या करण्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2015 मध्ये 91,528 लोकांनी आत्महत्या केली. तर, 2005 आणि 2010 मध्ये अनुक्रमे 66,032 आणि 87,180 इतक्या पुरुषांनी आत्महत्या केली. मात्र, या पंधरा वर्षांमध्ये महिलांचे आत्महत्येचे प्रमाण तुलनेत कमी राहिले. (हेही वाचा, आत्महत्या करण्यासाठी व्यक्ती का प्रवृत्त होतो? तत्पूर्वी 'या' काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा)

आत्महत्या करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशातूनच जागकित आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जाऊ लागला. वेळेपुर्वी होणाऱ्या मृत्यूस आत्महत्याच कारणीभूत ठरते. हा प्रकार अनैसर्गिक आहे. तो टाळता येऊ शकतो. म्हणूनच जगभरातून या विषयावर काम होते आहे. 10 सप्टेंबर हा आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.