World Sleep Day 2019: नवजात बालकं, प्रौढ व्यक्ती, वृद्ध लोकं यांना निरोगी आरोग्यसाठी किती तास झोप आवश्यक?
Sleep Health Journal ने दिलेल्या माहितीनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाच्या शरीरात बदल होत असतात. बदलती जीवनशैली आणि आरोग्य यांची सांगड घालण्यासाठी प्रत्येकाला वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या तासाचा आराम आणि झोप आवश्यक आहे
15 मार्च हा दिवस World Sleep Day म्हणून जगभरात साजरा केला जातो. यंदा हे बारावं सेलिब्रेशन आहे. World Sleep Day 2019 हा दिवस यंदा ‘Healthy Sleep, Healthy Aging,’या थीमवर साजरा केला जाणार आहे. योग्य वेळेत आणि पुरेशी झोप ही नवजात बालकांपासून अगदी वयोवृद्धांसाठी आवश्यक आहे. उत्तम झोप हे निरोगी आरोग्याचं गुपित आहे. त्यामुळे पहा प्रत्येकाला कोणत्या टप्प्यावर किती झोप घेणं आवश्यक आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का?
Sleep Health Journal ने दिलेल्या माहितीनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाच्या शरीरात बदल होत असतात. बदलती जीवनशैली आणि आरोग्य यांची सांगड घालण्यासाठी प्रत्येकाला वयाच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या तासाचा आराम आणि झोप आवश्यक आहे.
- नवजात बालकं – नुकताच जन्म झालेले बाळ पहिल्या 3 महिन्याच्या टप्प्यापर्यंत सुमारे 14-17 तास रोज झोपते.
- जसजशी मुलांची वाढ होते तसे ते सुरूवातीला 4-11 महिन्याच्या काळात 12-15 तास झोपते.
- पहिल्या 1-2 वर्षांची मुलं अॅक्टिव्ह होतात, त्यांची वाढ होत असताना दिवसभरात 11-14 तास झोप आवश्यक असते.
- तीन ते साडे तीन वर्षापासून मुलं शाळेत, नर्सरीमध्ये शिकायला लागतात. तेव्हा 6-13 वर्ष या शालेय जीवनात मुलांना दिवसभरात 9-11 तास झोप नियमित आवश्यक आहे.
- 14-17 वर्षात मुलं आणि मुली दोन्हींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. अशा काळात शारिरीक वाढीसाठी नियमित 8-10 तास झोपणे आवश्यक आहे.
- 18-25 या तारूण्याच्या काळात काम, शिक्षण, धावपळ अधिक प्रमाणात होते त्यामुळे या वयोगटात 7-9 तास झोप पुरेशी आहे.
- 26- 64 या प्रौढ वयोगटातील मंडळीदेखील 7-9 तास झोपणे आवश्यक आहे. या टप्प्यामध्ये स्त्रियांच्या जीवनात 'मातृत्त्व' आणि 'मेनोपॉज'चा टप्पा असतो. त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होतात. या काळात गरोदर स्त्रियांना अधिक झोपेचे गरज असते. गर्भारपणात झोप येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे.
- जसजसा आयुष्याचा टप्पा वार्धक्याकडे जातो तशी झोप कमी होण्यास सुरूवात होते. 64 हून अधिक वयातील मंडळींमध्ये किमान 7-8 तास झोप पुरेशी असते. अनेकांची झोप कमी होते.
वेळच्या वेळी पौष्टिक आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप यामुळे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे वयानुसार तुमची जीवनशैली जरी बदलली तरीही झोपेच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. झोपेच्या गणितावरही अनेक आजार अवलंबून असतात.
(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2019 11:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

