हृदयाची वेळीच काळजी घ्या (संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

गेल्या काही वर्षांपासून भारतीयांमध्ये हृदयरोग किंवा हृदयाशी संबंधीत आजाराचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. अगदी मी मी म्हणणाऱ्या मंडळींनाही हृदयरोग आणि हृदयाशी संबंधीत आजारांनी जेरीस आणले आहे. अर्थात, विज्ञान आणि वैद्यकीय संशोधन प्रचंड वाढल्याने अनेक आजारांवरची औषधं, उपचार नक्कीच उपलब्द आहेत जरुर. पण, म्हणून काही सर्वच आजारांवर वैद्यकीय उपचारांनी मात करता येते असे नाही. पण, तुम्ही आरोग्याबाबत सजक असाल आणि वेळीच काळजी घ्याल तर, या आजारांना जरुर दूर ठेऊ शकता. जाणून घ्या हृदयाची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाल.

एक दिवसात किती तेल आहारात घ्याल?

आरोग्यदायी हृदय मिळवण्यासाठी खाण्यापीण्यावर प्रचंड नियंत्रण ठेवा. आहार योग्य असेल तर, शरीरातील रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात. त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. वाहिन्यांचा लवचिकपणका चांगला राहतो. त्यासाठी आहारात तेलाचे प्रमाण योग्य असावे लागते. दिवसभरातील एकूण आहारात दोन ते तीन छोट्या चमचांपेक्षा अधिक तेल आहारात अजिबात असू नये. यासोबतच तूप, लोणी आदि गोष्टींचे सेवन करतानाही काळजी घ्या.

एकच तेल सतत वापरणे टाळा

तुम्ही जर एकाच ब्रांडचे तेल नियमीत वापरत असाल तर, ते त्वरीत बंद करा. प्रत्येक तीन महिन्यानंतर आहारात वापरले जाणारे खाद्यतेल बदलत राहा. यावरचा सोपा उपाय म्हणजे तुम्ही, किचनमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमधून तयार केलेली तेलं ठेऊ शकता. जसे की, शेंगदाणा, सुर्यफूल, तिळ, सोयाबिन वैगेरे. या तेलांचा वापर पदार्थ बनवताना आलटून पालटून करु शकता. (हेही वाचा, World Heart Day : हार्ट अटॅक जीवावर बेतण्यापूर्वीच ठेवा या ५ गोष्टींचं भान)

सलाड खाताना मिठाचा वापर टाळा

आहारात नेहमी फळे आणि सलाडचा वापर करा. शक्यतो जेवनापूर्वी सलाड खाण्यावर भर द्या. सलाडमुळे पचनक्षमता वाढते. तसेच, शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. पण, ध्यानात ठेवा की, सलाड खूप वेळ ठेऊ नका. ते लगेच खा. तसेच, अनेकांना सलाड खाताना सोबत मिठाचा वापर करण्याची सवय असते. ही सवय बंद करुन मिठाचा वापर न करता सलाड घाण्याची सवय लाऊन घ्या. संध्याकाळी सलाड खाताना फळांची सालं आणि भाज्यांचाही वापर करु शकता.

लसुण खा तंदुरुस्त राहा

लसनाच्या ५ कुड्या दररोज खा. लसणात एलिसिन असते. जे शरीरातील रस्तासाठी फायदेशीर असते.