World Brain Day 2020: जागतिक मेंदू दिन यानिमित्ताने जाणून घ्या दिवसाचे महत्त्व, इतिहास आणि थीम!
मेंदूच्या स्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 जुलै हा दिवस वर्ल्ड ब्रेन डे म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया जागतिक मेंदू दिनानिमित्त काही खास गोष्टी...
मेंदूच्या स्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 22 जुलै हा दिवस 'वर्ल्ड ब्रेन डे' (World Brain Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी (World Federation of Neurology) म्हणजेच डब्ल्यूएफएन (WFN) 6 व्या वर्ल्ड ब्रेन डे (6th Annual World Brain Day) निमित्त आंतरराष्ट्रीय पार्किंसंस एंड मूवमेंट डिसऑर्डर सोसायटी (International Parkinson and Movement Disorder Society) सह भागीदारी करेल. मेंदू हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव. यंदा हा दिवस पार्किंसंस रोगाप्रती जागरुकता वाढवण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. पार्किंसंस हा एक न्यूरोडीजेनेरेटिव्ह मेंदूचा रोग (Neurodegenerative Brain Disease) असून यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी द यांनी 2014 पासून वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय लीग, अगेंस्ट एपिलेप्सी, वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गेनाईजेशन आणि इंटरनॅशनल हेडेक सोसायटी यांसारख्या संस्थांनी एकत्र येऊन मेंदूच्या विकारांसंबंधित जागरुकता वाढवण्यासाठी काम केले. मेंदूच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हे यामागील उद्देश होते.
वर्ल्ड ब्रेन डे इतिहास
22 जुलै 1957 रोजी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेने वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. जगभरात मेंदूच्या स्वास्थ्याविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी 22 जुलै 2014 रोजी पहिल्यांदा वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यात आला. दरम्यान वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यात येईल याची घोषणा 22 सप्टेंबर 2013 मध्ये करण्यात आली होती.
वर्ल्ड ब्रेन डे चे महत्त्व आणि थीम
दरवर्षी एका विशेष थीमवर हा दिवस साजरा केला जातो. Move Together to End Parkinson’s Disease ही यंदाची थीम आहे. रिपोर्ट्सनुसार, मीडिया, सोशल मीडिया माध्यमे, स्थानिक क्षेत्रं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बैठकांतून जागरुकता पसरवणे हा वर्ल्ड ब्रेन डे साजरा करण्यामागील उद्देश आहे.
Wfneurology.org नुसार यंदा जागरुकतेच्या या अभियानाचा विषय 'Our brain, Our future' असा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 22, 2020 09:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

