sleeping woman (PC - Pixabay)

Women Need More Sleep Than Men: तुम्हाला माहिती असेल की, दिवसा चांगले काम करण्यासाठी आपल्याला 7-8 तासांची झोप आवश्यक आहे. पण जर तुम्ही स्त्री असाल आणि आठ तास झोपूनही तुम्हाला थकल्यासारख वाटत असेल कारण, तुम्हाला जरा जास्त वेळ झोपण्याची गरज आहे. पुरुष 7-8 तासांच्या झोपेनंतर चांगले काम करू शकतात. स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. मुंबईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रुग्णालयातील डॉ. सोनम सिम्पतवार यांनी इंडिया टुडेला सांगितलं की, एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून, मी पुष्टी करू शकते की, अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना झोपेची जास्त गरज असते.

चांगली झोप का महत्त्वाची आहे?

मॅग्निफ्लेक्स इंडियाच्या झोपेचे विशेषज्ञ डॉ निवेदिता कुमार सांगतात की, झोप हा चांगल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. चांगली झोप मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि वाढवते. तसेच झोपेमुळे हृदयाचे आरोग्य, चयापचय, त्वचा आणि केसांची गुणवत्ता आणि दीर्घायुष्य वाढवते. दर्जेदार झोप तुम्हाला तुमच्या भावना चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करते. प्रदीर्घ काळ दर्जेदार झोप न मिळाल्याने स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर यांसारखे न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. दीर्घकाळात, याचा परिणाम लठ्ठपणा, हृदयविकार आणि पक्षाघात होऊ शकतो. (वाचा - Sleep Deprivation: जर तुमचीही झोप कमी होत असेल तर व्हा सावध! स्मरणशक्तीसोबतच मेंदूवरही होऊ शकतो विपरीत परिणाम, जाणून घ्या काय सांगतो AIIMS चा अभ्यास)

झोपेच्या दरम्यान, शरीरात ऊतकांची दुरुस्ती, स्नायूंची वाढ आणि संप्रेरक नियमन यासारख्या आवश्यक प्रक्रिया होतात. दीर्घकाळच्या झोपेची कमतरता शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय प्रतिकूल परिणाम करू शकते. यामुळे संज्ञानात्मक कार्य, स्मरणशक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता बिघडू शकते, ज्यामुळे उत्पादकता कमी होते.

झोपेच्या गरजा वयानुसार बदलतात -

नवजात आणि लहान मुलांना सर्वात जास्त झोपेची आवश्यकता असते. सरासरी, प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी आणि कामकाजासाठी रात्री 7-9 तासांची झोप लागते. वयानुसार झोपेची गरज थोडीशी कमी होत असली तरी वृद्ध व्यक्तींना प्रति रात्री सुमारे 7-8 तासांची झोप लागते. तथापी, अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की महिलांना पुरुषांपेक्षा सुमारे 20 मिनिटे जास्त झोप लागते. मेंदूला सावरण्यासाठी आणि स्वतःला दुरुस्त करण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. स्त्रियांमध्ये झोपेच्या विकारांबाबत फारसा डेटा उपलब्ध नसला तरी, संशोधन असे सुचवते की स्त्रियांना दैनंदिन कामकाजातून बरे होण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता असू शकते. (हेही वाचा: Bidi is More Dangerous than Cigarette: सिगारेटपेक्षा 8 पट जास्त घातक आहे बिडी; तज्ज्ञांनी दिली माहिती, जाणून घ्या सविस्तर)

कारण, स्त्रियांचा मेंदू वेगळ्या पद्धतीने वायर्ड असतो. तो पुरुषांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा असतो. स्त्रिया अधिक कार्य करण्यासाठी आणि त्यांच्या मेंदूचा अधिक वापर करण्यासाठी ओळखल्या जातात. ज्यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा किंचित जास्त झोपेची आवश्यकता असते. दरम्यान, स्लीप फाउंडेशनने नमूद केल्याप्रमाणे, सरासरी प्रौढ व्यक्तीला दररोज रात्री किमान सात तासांची झोप लागते आणि महिलांना सरासरी 11 अतिरिक्त मिनिटे झोपेची आवश्यकता असते.

याव्यतिरिक्त, स्त्रियांना निद्रानाश, चिंता आणि नैराश्य येण्याची शक्यता असते, ज्यामुळे झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. संशोधन असेही सूचित करते की, स्त्रियांना झोपेचा एकूण वेळ जास्त असतो आणि जागृत होण्याची वेळ कमी असते. त्यांची झोपेची क्षमता पुरुषांपेक्षा चांगली आहे. तथापि, पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाशाचा धोका सुमारे 40 टक्के जास्त असतो.

यामागे हार्मोन्स आहेत का?

अभ्यास असे सूचित करतात की, झोपेत जास्त वेळ घालवल्यानंतरही, महिलांमध्ये व्यत्यय आणि झोपेचा त्रास यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. महिलांच्या झोपेवर हार्मोनल बदलांचा परिणाम होतो. संपूर्ण मासिक पाळीत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या हार्मोन्समधील चढ-उतार झोपण्याच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणू शकतात. हे व्यत्यय मासिक पाळीपूर्वीच्या टप्प्यात अधिक स्पष्ट केले जाऊ शकतात. याशिवाय, गर्भधारणेदरम्यान, शारीरिक अस्वस्थतेसह हार्मोनल बदल झोपेत व्यत्यय आणू शकतात. रजोनिवृत्तीचे संक्रमण हा आणखी एक महत्त्वाचा हार्मोनल बदल आहे. याचाही झोपेवर परिणाम होतो.