चहा हे असे एक पेय आहे, ज्याची क्रेझ भारतात अगदी सर्वत्र पाहायला मिळते. भारतीयांचे चहावर असलेले प्रेम पाहून त्यावर वेळोवेळी अनेक प्रयोगही झाले. आयुर्वेदाने याला संपूर्ण औषध म्हटले आहे. आयुर्वेदात, सामान्य चहापासून ते काढ्यापर्यंत अनेक प्रकार सांगितले आहेत. हे प्रकार सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा अनेक समस्यांवर योग्य उपचार असल्याचे सांगितले गेले आहे. आम्ही चहाचा उल्लेख अशासाठी केला कारण मुंबईपासून साधारण 64 किमी अंतरावर असलेल्या कर्जत येथील रॅडिसन ब्ल्यूचे (Radisson Blu) शेफ राजीव कुमार यांनी चहाचे अनेक प्रकार तयार केले आहेत, ज्याचा वापर कोरोना व्हायरस संसर्गाच्या काळात मोठ्या प्रमाणावर झाला आहे. चहाचे हे सर्व प्रकार रॅडिसन ब्ल्यू, कर्जत याठिकाणी उपलब्ध आहेत.
फक्त चहाचेच प्रकार का तयार केले गेले?
कोविड संसर्गावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्यामुळे, लोकांनी विविध इतर औषधे, वनौषधी मोठ्या प्रमाणात वापरली. यामध्ये सर्वात सुरक्षित मानले गेले ते ग्रीन टी, ब्लॅक टी, आयुष काढा इ. याचा मोठ्या प्रमाणावर लाभही लोकांना मिळाला. यातूनच प्रेरित होऊन शेफ राजीव कुमार यांनी विविध प्रकारचे चहा लोकांसमोर मांडले. या चहाच्या प्रकारांचे अनेक लोकांकडून कौतुक झाले आहे.
'आपण एक शेफ आहात, आपल्याकडे पदार्थांची मोठी यादी असेल, अशावेळी चहावरच इतके काम का केले गेले?' असा प्रश्न राजीव यांना विचारला असता, ते म्हणाले- 'खरेतर, कोविड काळात, ग्राहक ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या जेवणानंतर नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तयार केलेल्या पदार्थांची किंवा पेयांची मागणी करत असत. यामध्ये विशेषतः चहा आणि काढ्यांचा समावेश होता. यामुळे आपल्याला सर्दी, घसादुखी किंवा डोकेदुखीपासून आराम मिळेल, आपली प्रतिकारशक्ती वाढेल असा त्यांचा समज होता.'
ते पुढे म्हणतात, 'या काळात काढ्याला चांगलीच मागणी होती. त्यानंतर आम्ही चहावर काम करायचे ठरवले. त्यासाठी आम्हाला, दार्जिलिंगपासून शिमल्यापर्यंत चहाच्या बागा असलेले सिलीगुडीचे एक खूप मोठे चहाचे व्यापारी राजीव लोचन गुप्ता यांनी विशेष पाठिंबा दिल्याने कामाला जोर मिळाला. आमच्या कंपनीने त्यांच्याशी करार केला आहे आणि आम्ही यावर एकत्र काम करत आहोत.'
आज आम्ही शेफ राजीव कुमार यांनी बनवलेल्या चहाच्या विविध प्रकारांबद्दल माहिती देत आहोत, तर चला जाणून घेऊया.
हर्बल चहा-
‘हर्बल टी’मध्ये प्रामुख्याने ज्येष्टमध आणि हळद असते. या चहामध्ये साखर तसेच दुध घालत नाहीत. ज्येष्टमध हे साखरेची कमतरता भरून काढते. हळद दात स्वच्छ करते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि रक्त शुद्ध करते. त्यामुळे हर्बल चहाचे खूप जास्त महत्त्व आहे. कोरोनामध्ये अशा हर्बल चहाला खूप मागणी होती.
व्हाईट टी-
सर्वसामान्यपणे चहाच्या बागेच्या पिकाच्या माथ्यावरची ताजी पाने बोटांनी खुडून त्यापासून पुढे चहा पावडर तयार केली जाते. ही पाने सकाळी 7 ते 10 या वेळेत सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी खुडून घ्यावीत. पाने खुडून ती पाण्यात उकळली जातात. यावेळी ही गोष्ट आवर्जून पहिली जाते की, पाने हिरवी आणि जास्त गडद होण्या दरम्यान पाण्यातून बाहेर काढली जातात. त्यामुळे त्याचा ऑक्सिजन निघून जातो परंतु त्याची चव लोण्यासारखी असते.
ग्रीन टी-
ग्रीन टीमध्ये हिरवी पाने गरम पाण्यात टाकली जातात. हा चहा अँटीऑक्सिडंट्स वाढवतो. लठ्ठपणा कमी करतो. मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो, अशाप्रकारे यामध्ये अजूनही अनेक उपयोगी गुणधर्म असतात.
हर्बल तुळशीचा चहा-
आपल्या देशात मसाला चहाला खूप मागणी आहे. हा चहा आसाम आणि दार्जिलिंगच्या सामान्य चहासारखाचा असतो, परंतु त्यामध्ये मेथी, जिरे, बडीशेप, ओवा, काळे जिरे अशा पाच मसाल्यांचे मिश्रण असते. हे मसाले पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत, यामुळे हा चहा चविष्ट तर असतोच त्याचसोबत तो अतिशय गुणकारीदेखील असतो. (हेही वाचा: Corbevax कोविड 19 लस 5-12 वयोगटातील मुलांना देण्याकरिता आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी Biological E कडून अर्ज; सूत्रांची माहिती)
आयुष काढा-
कोविड काळात आयुष काढ्याला सर्वाधिक मागणी होती आणि अजूनही त्याची मागणी तशीच आहे. कच्ची हळद, पेपरमिंट यांसारखे 10 ते 12 प्रकारचे नैसर्गिक आयुर्वेदिक पदार्थ मिसळून आयुष काढा तयार केला जातो. यामुळे सर्दी, ताप, घसादुखी, खोकला इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.