Corbevax कोविड 19 लस  5-12 वयोगटातील मुलांना देण्याकरिता आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी Biological E कडून अर्ज; सूत्रांची माहिती
Corbevax | PC: Twitter/ANI

हैदराबादची फार्मासेट्युकल कंपनी Biological E कडून COVID-19 Vaccine Corbevax साठी आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात आला आहे. Corbevax ही लस 5 ते 12 वयोगटातील मुला-मुलींसाठी देण्याची यामध्ये परवानगी मागण्यात आली असल्याचं अधिकृत सूत्रांनी म्हटलं आहे. याबाबतचा डाटा कंपनीकडून Subject Expert Committee कडे देण्यात आला आहे.

नुकतीच Subject Expert Committee कडून 12-18 वयोगटातील मुलांना Corbevax देण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र त्यासाठी काही अटी शर्थी देखील घालण्यात आल्या होत्या. The Drugs Controller General of India कडून लवकरच Corbevax च्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अंतिम परवानगी लवकरच दिली जाण्याची चिन्हं आहेत. SEC कडून लसीचा विशिष्ट वर्गावर immunogenicity data आणि सुरक्षितता पाहून मगच आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी हिरवा कंदील दिला जातो. नक्की वाचा: COVID-19 Vaccination For Teenagers: 15-18 वर्षीय मुलांसाठी आजपासून कोविड 19 चे लसीकरण; पहा Co-WIN वर स्लॉट कसा कराल बूक? 

लसीची अपेक्षित किंमत 145 रूपये आहे. या लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या लसीचे 5 कोटी डोस विकत घेतले आहेत. हे डोस काही राज्यांमध्ये वितरितही केले आहेत.

Biological E कडून फेझ 2, 3 चे क्लिनिकल ट्रायल्स सप्टेंबर 2021 मध्ये सादर केले होते.

देशात गेल्या २४ तासांत ४ हजार ५७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर ७४१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.