COVID-19 Vaccination For Teenagers: 15-18 वर्षीय मुलांसाठी आजपासून कोविड 19 चे लसीकरण; पहा Co-WIN वर स्लॉट कसा कराल बूक?
COVID 19 Vaccine| PC: Pixabay.com

भारतामध्ये कोरोना संक्रमण (Coronavirus) पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने आता देशात वयोवृद्धांना बुस्टर डोस आणि 15-18 वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरूवात होत आहे. आज (3 जानेवारी) पासून भारतामध्ये टीनेजर्सना कोविड 19 लसीचा डोस दिला जाणार आहे. यासाठी 1 जानेवारी पासून कोविन अ‍ॅप (Co-WIN App) वर रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान 15-18 वयोगटातील मुलांना केवळ कोवॅक्सिन लस (Covaxin) देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांचाही जन्म 2007 किंवा त्यापूर्वीचा असेल तर ती मुलं आजपासून लस घेण्यास पात्र आहेत. त्यांना लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करून स्लॉट बूक करता येणारआहे.

भारतामध्ये सध्या कोविन अ‍ॅप वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात 6,79,064 मुलांचे लसीकरणासाठी कोविन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. मुंबई मध्ये आज बीकेसी कोविड सेंटर वर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लहान मुलांच्या लसीकरणाला सुरूवात केली आहे. Vaccination Center List For Teenagers In Pune: पुण्यामध्ये या 5 कोरोना लसीकरण केंद्रावर 15-18 वर्षीय मुलांना मिळणार लस; पहा यादी .

इथे पहा लहान मुलांसाठी कसा बूक कराल स्लॉट?

  • लाभार्थी कोविन अ‍ॅप वर त्यांच्या अकाऊंट वरून किंवा सेल्फ रजिस्टर करून वॅक्सिनेशन स्लॉट बूक करू शकतात.
  • नवीन अकाऊंट बनवण्यासाठी तुम्हांला मोबाईल नंबर एंटर करावा लागेल. त्यानंतर वन टाईम पासवृड किंवा ओटीपी येईल.
  • अकाऊंट बनवल्यानंतर तुम्ही डिटेल्स टाकून रजिस्ट्रेशन करू शकता.
  • कोविन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हांला स्लॉट बूक करण्याचा पर्याय दिसेल. याकरिता तुम्ही नजिकच्या वॅक्सिनेशन सेंटरची माहिती मिळवू शकता.
  • लाभार्थी व्यक्ती /मुलं ऑफलाईन देखील लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

लहान मुलांच्या लसीकरणाकरिता आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र नसल्यास त्यांना दहावीचे आयडी कार्ड वापरून देखील रजिस्ट्रेशनसाठी मुभा देण्यात आलेली आहे. लहान मुलांच्या लसीकरणामध्ये केवळ कोवॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. ही लस 28 दिवसांच्या फरकाने दिली जाते. तर देशात आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या प्रयत्नाने ती विकसित करण्यात आली आहे.

भारतामध्ये कोविड19 ची वाढती रूग्णसंख्या सामान्यांची चिंता वाढवणारी आणि आरोग्य प्रशासनासमोरील आव्हानं वाढवणारी आहे. पण सध्या अनावश्यक गर्दी टाळण्याचं आणि कोविड19 नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.