Corbevax| Representative Image| PC: Twitter/ANI

भारतामध्ये कोरोनाचं संकट आटोक्यात आल्याचं चित्र असलं तरीही आता सरकारचा लसीकरणावरचा भर कायम आहे. यामध्ये आता किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा टप्पा देखील हाती घेण्याचा विचार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, DCGI च्या Subject Expert Committee ने Corbevax या लसीला 12-18 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दिल्याचं वृत्त आहे.

दरम्यान Corbevax, ही लस हैदराबाद येथील फार्मासेट्युकल कंपनी बायोलॉजिकल ई ची लस आहे. मात्र त्याच्या वापरासाठी काही अटी देखील असतील. लवकरच केंद्रीय यंत्रणा या लसीच्या वापरासाठी परवानगी देतील अशी अपेक्षा आहे. Corbevax, ही लस देखील दोन डोस मधील आहे. या लसीचा इम्युनोजेनिसिटी डाटा पाहून त्याला लहान मुलांवर त्याची सुरक्षितता पाहूनच आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात येईल.

Corbevax, लसीची किंमत अंदाजे 145 रूपये आहे. यामध्ये टॅक्स समाविष्ट नसेल. अशी सूत्रांची माहिती आहे. 18 वर्षांखालील मुलांसाठी Corbevax, ही कोवॅक्सिन नंतर आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळवणारी भारतातील दुसरी लस आहे. लवकरच त्याचा क्लिनिकल डाटा देखील सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. COVID-19 Vaccination For Teenagers: 15-18 वर्षीय मुलांसाठी आजपासून कोविड 19 चे लसीकरण; पहा Co-WIN वर स्लॉट कसा कराल बूक? 

भारतामध्ये 2022 च्या सुरूवातील 15-18 वर्षांच्या मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मुलांना केवळ कोवॅक्सिन लस दिली जात आहे. त्यानुसार सध्या या वयोगटातील देशातील 1.5 कोटी मुलं लसवंत झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, Corbevax, लसीसाठी केंद्र सरकारकडून डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. अंदाजे 5 कोटी डोसची ही ऑर्डर आहे. ऑगस्ट 2021 मध्येच या लसीच्या 30 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली आहे. या महिन्यात कंपनीकडून डोस पुरवले जाऊ शकतात. HLL Lifecare Limited कडून ऑर्डर सप्लाय करण्यात येणार आहे.