प्रत्येक ऋतूच्या बदलानुसार आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा वातावरणाचा परिणाम होऊ सतत छोटेमोठे आजार ओढवण्याची भीती असते. हिवाळ्यातही नेहमी डोके वर काढणारा त्रास म्हणजे युरीन इन्फेक्शन (Urine Infection). साधारणतः महिलांमध्ये अधिक जाणवणारा हा त्रास प्रायव्हेट पार्ट जवळील बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे उद्भवतो. लघवी करताना जळजळ जाणवणे, हुडहुडी भरणे, ओटीपोट दुखणे, दुर्गंधी येणे, चक्कर आणि मळमळ ही सर्व या इन्फेक्शनची लक्षणे आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, यामागील मुख्य कारण म्हणजे निष्काळजी. अनेकदा आपण वेळच्यावेळी लघवीला जाण्यासाठी टाळाटाळ करतो याच गंभीर परिणाम पेल्व्हिक स्नानयुंवर ताण पडून अशा प्रकारचे त्रास बळकट होतात. थंडीच्या मोसमात हवामानातील गारव्यामुळे पाणी पिण्यात देखील अनेकजण कंटाळा करतात यामुळे हा त्रास आणखीन वाढतो. (Vagina Cleaning: प्रायव्हेट पार्ट जवळील त्वचा काळी पडत असल्यास करा 'हे' घरगुती उपाय)
युरीन इन्फेक्शन वर जर औषधे गोळ्या उपलब्ध असल्या तरी अनेकांना औषधांमुळे ऍसिडिटी होते ज्यामुळे उपाय होण्याऐवजी अपाय होण्याचीच जास्त शक्यता असते. पण मग या वर नेमका उपाय तरी काय? काळजी करू नका आज या लेखातून आम्ही आपल्याला युरीन इन्फेक्शनवर रामबाण ठरणारे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, चला तर पाहुयात..
सब्जा सरबत
शरीरातील हिट वाढल्याने युरीन इन्फेक्शन होते, त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सब्जाचे भिजवून ठेवून त्याचे सरबत प्या, यात चवीसाठी फळांचे सिरप मिसळू शकता.
सी व्हिटॅमिन युक्त फळे
लिंबू, संत्री, मोसंबी या वर्गातील फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. यांच्या सेवनाने शरीरात ऍसिडचे प्रमाण वाढून बॅक्टेरियाची वाढ थांबते आणि त्रासातून सुटका मिळते. यासाठी आवळा, किवी, द्राक्ष अशा फळांचे रस देखील फायदेशीर ठरतात.
काकडी
काकडीतील अल्काईन ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे शरीराला थंडावा मिळतो. गडद हिरव्या रंगाची काकडी कोणतेही अधिक मसाले न टाकता खाल्ल्याने पाचनक्रिया देखील सुधारते.
मेथी किंवा धण्याचे पाणी
मेथीचे दाणे पाण्यात भिऊन ठेवून तेच पाणी प्या. यामुळे पोटातील PH लेव्हल संतुलित राहण्यास मदत होते. विषारी बॅक्टेरिया बाहेर फेकले गेल्याने तुम्हाला अगदी त्वरित आराम मिळू शकतो. यासोबतच
आलं
आल्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल तत्वांमुळे लघवीतील बॅक्टेरिया आणि अन्य प्रकारचे व्हायरस यांना आळा बसतो. ज्यामुळे युरिन इन्फेक्शन दूर होतं. तुम्ही आल्याचा रस कोमट दूधातून किंवा आल्याचा चहा घेऊनही करू शकता.
युरीन इन्फेक्शन मुळापासून घालवण्यासाठी शरीराला आवश्यक तितके पाणी प्या. साधारण एका तासाच्या अंतराने पाणी प्यायालाच हवे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी थंड पाणी पिण्याएवजी कोमट पाणी घ्या. लक्षात राहात नसल्यास अलार्म लावून नोंद करून ठेवा, कारण पूर्वकाळजी ही कधीही उपचारांपेक्षा उत्तम असते.. बरोबर ना?
(टीप: हा लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. यास वैदकीय सल्ला समजु नये.)