Vagina Cleaning: प्रायव्हेट पार्ट जवळील त्वचा काळी पडत असल्यास करा 'हे' घरगुती उपाय
Vagina cleanliness (Photo Credits: Unsplash)

अनेकदा पार्टनर ओरल सेक्स (Oral Sex) करण्यापासून टाळाटाळ करतात, यामागे कारण म्हणजे त्यांची इच्छा नाही असे असेल का? तर नाही, असा ग्रह करून घेण्याआधी एकदा हा लेख जरूर वाचा. महिला किंवा मुलींच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part)  जवळील त्वचा अनेकदा काळी पडते, अति घट्ट कपडे घातल्याने किंवा नियमित निगा न राखल्याने हा त्रास जाणवू शकतो. अर्थात यामुळे प्रायव्हेट पार्टचे नैसर्गिक सौंदर्य खराब होते आणि परिणामी ओरल सेक्स करण्यासाठी पार्टनरचा उत्साह कमी होऊ शकतो. पण मग यावर उत्तर काय ? मुळातच ही त्वचा अत्यंत नाजूक असल्याने तिथे कॉस्मॅटिक्स वापरणे देखील धोक्याचे ठरू शकते. पण घाबरू नका या समस्येवर आज आम्ही आपणास उपाय सांगणार आहोत. काही घरगुती उपाय वापरून अगदी कमी वेळात तुम्ही या काळ्या त्वचेवर तोडगा काढू शकता. काय आहेत हे उपाय चला तर पाहुयात..

तुमचे वैवाहिक जीवन Boring झालं असेल तर ते Interesting करण्यासाठी आजमावून पाहा या '5' ट्रिक्स

लिंबू आणि मध

किमान अर्ध्या लिंबाच्या रसात मध मिसळून त्याच लिंबाच्या सालीने हा रस तुमच्या मांडीच्या आतील बाजू सहित प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला लावा. काही वेळ असा मसाज करून मग थंड पाण्याने धुवून टाका. या रसात किंचित साखर घालूनही तुम्ही स्क्रब प्रमाणे वापरू शकता.

हळद आणि कोरफड

तुम्हाला सर्वांनाच या दोन्ही वस्तूंचे त्वचेसाठीचे फायदे तर ठाऊकच असतील, हळदीमुळे त्वचेचा रंग उजळण्यास आणि कोरफडीमुळे त्वचा मुलायम होण्यास फायदा होतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून पहा.

बटाट्याची साल

बटाट्याचे स्लाईस कापून काळ्या झालेल्या भागावर चोळा. दिवसातून दोन वेळा साधारण 10-10 मिनिट्स तुम्ही हे करून पाहा. बटाट्यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट मुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.

How To Lighten Underarms: अंडरआर्म्स काळे पडले असतील तर घरीच करा 'हे' सोप्पे उपाय; काहीच दिवसात दिसेल रिझल्ट

तांदूळ पीठ+ लिंबू+ दही+ हळद

तुम्हाला थोडी संवाद असेल तर हा पॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 1 चमचा तांदूळ पीठ, हळद आणि दह्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकून एकत्रित करा. हा पॅक प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूच्या काळया त्वचेवर लावा मात्र आतील बाजूस याचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. काहीवेळाने सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाका.

काकडी

गडद हिरव्या रंगाची काकडी किसून तिचा गर काळ्या झालेल्या त्वचेवर लावा, 20 मिनिटांनी थंड पाण्याने ही त्वचा धुवून टाका.

दरम्यान, रोजच्या रोज प्रायव्हेट पार्टची योग्य स्वच्छता केल्याने, थोडे सैलसर कपडे घातल्याने, अंडरवेअर्स चला परतीच्या कापडाचे निवडल्याने त्वचा काळवंडण्याचा किंवा ऍलर्जीचा त्रास उद्भवणारच नाही.

(टीप: हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिलेला आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. आवश्यकता भासल्यास तुमचिया डॉक्टरांशी संवाद साधून मग संबंधित उपचार करावेत)