लग्न (Marriage) हा जरी इतरांसाठी एक सोहळा असला तरी ते त्या करणा-या दोन जीवांचे मधुर मिलन असते. सध्या लग्न म्हटलं की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असा पहिला प्रश्न विचारला जातो. मात्र सध्याच्या पिढी लग्नाआधीच एकमेकांना भेटून, बोलून, फिरून लग्नानंतरची मजा हरवून बसते. असं म्हणतात लग्नाआधी लग्नानंतरच्या अनेक गोष्टी करुन आपण त्या गोष्टींची मजा हरवू बसतो. त्यात दुसरीकडे आपले रोजचे भांडणं-तंटे, धकाधकीचे आयुष्य यामुळे कालांतराने लग्नानंतर काही वर्षांना आपल्याला आपले वैवाहिक जीवन रसहीन वाटू लागते. अॅरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज लग्नाच्या काही वर्षानंतर किंवा आपल्या आयुष्यात आपलं मूल आल्यानंतर अनेक जोडप्यांची आयुष्य बदलून जातात.
जर का आपल्याला आपले वैवाहिक जीवन Boring वाटू लागले की जोडप्यांमधील संवाद हरवतो, भांडणे होतात, चिडचिड होते. अशा वेळी आपल्या Boring झालेल्या वैवाहिक जीवनाला Interesting करण्यासाठी खाली दिलेल्या 5 आयडियाज नक्की ट्राय करुन पाहा
1) वेळात वेळ काढून छान डेटवर जा- डेट ही जोडप्यांमधील संवाद वाढविण्याचा उत्तम पर्याय आहे. कारण तेव्हा दोनच व्यक्ती तिथे असतात.
2) एकत्र नृत्य करा: जरी तुमच्या पार्टनरला नृत्याची आवड नसेल तरीही साध्या रोमँटिक गाण्यावर एकांतात हातात हात घालून छान नृत्य करा. यामुळे आपापसातील जवळीक वाढेल.
हेदेखील वाचा- Types Of Kisses: जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करण्यास मदत करतील हे 7 प्रकारातील चुंबन
3) एकत्र व्यायाम करा: यामध्ये तुम्ही एकतर एकत्र व्यायाम करु शकता किंवा एकत्र जॉगिंगला जा.
4) एकत्र स्वयंपाक करा: काही घरात पुरुषांना स्वयंपाक बनविण्याची आवड नसते तर काही ठिकाणी स्त्रियांना. अशा वेळी दोघांना एकत्र स्वयंपाक केला तर त्या पदार्थांप्रमाणे तुमच्या वैवाहिक आयुष्यातही गोडवा वाढवा.
5) एकत्र घर सजवाः एकत्र घरं सजविण्यामध्येही एक वेगळीच मजा आहे. घरं सजविताना एकमेकांच्या आवडी-निवडी विचारात घ्या. जेणे करुन घर सजवताना मजा येईल.
Haldi Kunku Ukhane:हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये' नाव घेण्याचा'अट्टाहास पूर्ण करण्यासाठी उखाणे - Watch Video
एक गोष्ट लक्षात ठेवा कुठलंही नातं तोपर्यंत जुनं होत जोपर्यंत आपल्याला ते आतून वाटत नाही आणि जर का तुम्हाला तसं वाटत असेल तर एकमेकांशी बोला आणि एकमेकांना जास्तीत जास्त वेळ द्या.