गुलाबी प्रेमाची खरी सुरुवात होते ती पहिल्या चुंबनाने (Kiss). मग ते चुंबन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडमधील असो किंवा नवरा-बायकोमधील. आपल्या जोडीदाराला दिलेले चुंबन हा जितका खास असतो तितकाच तो प्रेमाचा पहिला टप्पा असतो असं म्हणायला हरकत नाही. आपल्या जोडीदाराचा पहिला स्पर्श ही भावना जितकी सुखावह असते त्याहून जास्त आपल्या जोडीदाराला दिलेले चुंबन. त्यावेळी हे दोन व्यक्ती एकमेकांच्या मनाने आणि शरीराने एकमेकांच्या खूप जवळच येतात.
ह्या चुंबनाचे किंवा सध्याच्या भाषेत बोलायचे तर किस चे अनेक प्रकार आहेत. त्या प्रत्येक किसचा अर्थ तितकाच गोड आणि खास आहे. त्यामुळे प्रेमाच्या या गोड प्रवासात महत्त्वाचा टप्पा मानले जाणारे हे चुंबन इतके खास असते की जे आपल्या नात्याला खूप मजबूत बनवते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण काही कपल्स तर केवळ चुंबनाने आपल्या मनातील भावना प्रकट करतात. या प्रत्येक चुंबनाचा आपले नाते मजबूत बनविण्यास फार मोठा हात असतो. या 7 विविध प्रकारचे चुंबन वेगवेगळ्या अर्थाने तुमच्या मनातील भावना व्यक्त करतात मग जाणून हे 7 प्रकार कोणते?
1. गालावर केलेले चुंबन:
गालावर केलेले किस मधून तुमच्या त्या व्यक्तीविषयी असलेले प्रेम दर्शवतो. हे किस बहुदा आकर्षणाचे प्रतीक मानले जाते.
2. ओठांवर केलेले चुंबन:
हे तुमचे समोरच्या व्यक्तीवर किती प्रेम आहे हे प्रकट करतं. हे प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात चांगला प्रकार आहे. कारण ज्या चुंबनाने ते जोडप नि:शब्द होते आणि केवळ त्या नाजूक क्षणाचा आनंद अनुभवतो.
3. गळ्यावर केलेले चुंबन:
एखाद्याच्या शरीराविषयी असलेले आकर्षण व्यक्त करण्यासाठी गळ्यावर चुंबन केले जाते.
4. कानांवर केलेले चुंबन:
सेक्सविषयी तुमची भावना व्यक्त करण्यासाठी कानांवर किस केले जाते. त्याचा प्रभाव कानांवर किस घेणा-या व्यक्तीवर अवलंबून असतो.
हेही वाचा- Sex Life ची सुखावह आठवण देणारे 'Love Bites' लपवण्यासाठी करा हे उपाय
5. हातांवर केलेले चुंबन:
कोणाला प्रेमाची कबुली द्यायची असेल तर हातांवर किस केले जाते. त्याशिवाय हातांवर केलेले किस हे विश्वासाचे प्रतीक आहे.
6. कपाळावर केलेले चुंबन:
कपाळावर केलेले किस हे तुमच्या जोडीदाराप्रती असलेली ओढ दर्शवतो. जास्त करुन भावूक क्षणी हे चुंबन घेतले जाते.
7. फ्लाइंग किस:
फ्लाइंग किस हे ब-याचदा एकमेकांना निरोप देताना किंवा शुभेच्छा देण्यासाठी केले जाते.
थोडक्यात चुंबनाचे कितीही प्रकार येवो, पण प्रत्येक प्रकाराच्या चुंबनात व्यक्त होते ते म्हणजे त्या दोन व्यक्तींमधील अव्यक्त प्रेम. चुंबनाने केलेले हे अव्यक्त प्रेम खूप शांत, निरागस, सुखद असते असं म्हणणही योग्य आहे, नाही का?