Sex | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) एका कॅफेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाहिरातीत कॅफे ऑपरेटर दिपेश जैन प्रेमी जोडप्यांना खाजगी केबिन आणि किस करण्यासाठी जागा देण्याची ऑफर देत होता. म्हणजेच या कॅफेमध्ये अवघ्या 99 रुपयांमध्ये कपल्सना प्रायव्हेट जागा उपलब्ध करून दिली जात होती. या जाहिरातीचा एका व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर लोकांनी यावर आक्षेप घेत या कॅफेचा विरोध सुरू केला. लोकांच्या विरोधानंतर पोलिसांनी कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या कॅफे मालक दिपेश फरार आहे.

वृत्तानुसार, कॅफे ऑपरेटरने कॅफेमध्ये खास केबिन बनवल्या आहेत. या केबिन भाड्याने देण्यावरून गदारोळ झाला आहे. बीबीसी कॅफे असे या कॅफेचे नाव असून ते इंदूरच्या छत्रीपुरा पोलीस स्टेशनजवळ आहे. कॅफेच्या व्हायरल जाहिरातीनुसार, प्रेमी येथे 99 रुपये प्रति तास दराने खाजगी केबिन बुक करू शकतात. दिपेश जैन याने खास कलाकार घेऊन या कॅफेच्या जाहिरातीचे चित्रीकरण केले होते. त्यानंतर हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याचा विरोध सुरू केला. तरुणांमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप लोकांनी केला. कॅफेने याआधी जोडप्यांना 'विशेष सुविधा' पुरविल्याचा दावाही अनेक अहवालात केला जात आहे. इंदूरमध्ये असे अनेक कॅफे असल्याचेही सांगितले जात आहे, जेथे जोडप्यांना एकांत दिला जातो. (हेही वाचा: Serial killer's Shocking Story: ड्रग्ज घेऊन, पॉर्न पाहून करत असे मुलांची शिकार; 30 जणांवर बलात्कार करून केली हत्या, न्यायालयाने ठरवले दोषी)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी सार्वजनिक ठिकाणी बसलेले दिसत आहे. मुलगी त्या मुलाकडे अश्लील हावभाव करते आणि म्हणते की आता ते चुंबन घेऊ शकतात. यानंतर दोघे चुंबन घेण्यासाठी एकांत शोधू लागतात. दोघे लिफ्टमध्ये जातात, पण तिथे कोणीतरी येते. मग दोघेही ऑटोमध्ये जातात, इथेही ऑटोचालक त्यांना पाहत राहतो. त्याचवेळी मुलीला कॅफेची माहिती मिळते. जिथे खाजगी केबिन फक्त रु.99 मध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर मुलगी त्या मुलाला त्या कॅफेमध्ये घेऊन जाते.