Serial killer's Shocking Story: ड्रग्ज घेऊन, पॉर्न पाहून करत असे मुलांची शिकार; 30 जणांवर बलात्कार करून केली हत्या, न्यायालयाने ठरवले दोषी
Serial killer (Photo Credit : Pixabay)

उत्तर प्रदेशातील कासगंज (Kasganj) जिल्ह्यात कोर्टाने 30 मुलांवर बलात्कार (Rape) करून त्यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला दोषी ठरवले आहे. रवींद्र कुमार असे या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी 2015 मध्ये त्याला दिल्लीच्या बाहेरील भागातून अटक केली होती. न्यायालयाने कुमारला दोषी ठरवल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे. येत्या दोन आठवड्यात न्यायालय दोषी रवींद्रला शिक्षा सुनावणार आहे. रवींद्र कुमारने 2008 ते 2015 या काळात 30 मुलांना त्याचे शिकार बनवले होते.

माहितीनुसार, साधारण 2008 मध्ये, 18 वर्षीय रवींद्र कुमार कामाच्या शोधात उत्तर प्रदेशातील कासगंज येथून दिल्लीत आला होता. येथे तो मजूर म्हणून काम करू लागला. याच काळात त्याला अंमली पदार्थांचे व्यसन जडले. तो पोर्नोग्राफिक चित्रपट पाहायचा आणि त्या नंतर निरपराधांना आपल्या लैंगिक अत्याचाराचा बळी बनवायचा.

पुढच्या सात वर्षांत म्हणजे 2015 पर्यंत कुमारने 30 मुलांना आपल्या वासनेचे शिकार बनवले होते. रवींद्र कुमारला 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. न्यायालयाने मंगळवारी त्याला दोषी ठरवले. पोलीस तपासानुसार, दिल्लीत आल्यानंतर रवींद्र कुमारने ड्रग्ज घेणे, अश्लील चित्रपट पाहणे आणि लैंगिक अत्याचारासाठी लहान मुलांचा शोध घेणे सुरू केले. मुलांची शिकार केल्यानंतर तो त्यांना मारून टाकायचा. 2008 मध्ये सुरू झालेली ही मालिका 2015 मध्ये पोलिसांनी त्याला अटक केल्यावर थांबली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी रवींद्र दिल्लीत त्याच्या आई-वडिलांसोबत झोपडपट्टीत राहत होता. त्याचे वडील प्लंबर होते, तर आई लोकांकडे घरकाम करायची. रवींद्र कुमार हा दिवसा मजूर म्हणून काम करायचा आणि संध्याकाळी अंमली पदार्थांचे सेवन करून, अश्लील व्हिडीओ पाहून मुलांची शिकार करायला घराबाहेर पडायचा. यासाठी रवींद्र तब्बल 40 मैल चालत गेल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (हेही वाचा: Brother Kills Sister After First Period: उल्हासनगरमध्ये रक्तस्त्राव लैंगिक संबंधामुळे झाल्याच्या संशयामुळे लहान बहिणीची हत्या)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोषी रवींद्र हा मुलांना 10 रुपयांच्या नोटा आणि चॉकलेटचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेत असे. सर्वात लहान पीडित 6 वर्षांची होती आणि सर्वात मोठी 12 वर्षांची होती. रवींद्र कुमारला 2015 मध्ये दिल्ली पोलिसांनी पकडले होते, तेव्हा त्याच्यावर 6 वर्षांच्या मुलीचे अपहरण, हत्येचा प्रयत्न आणि शारीरिक शोषणाचा आरोप होता. त्याने या मुलीचे अपहरण करून सेप्टिक टँकमध्ये फेकून दिल्याचा आरोप होता. रवींद्रने 2008 मध्ये पहिल्यांदा दिल्लीतील कार्ला परिसरातून एका मुलीचे अपहरण केले. त्यानंतर त्याने बलात्कार करून तिची हत्या केली.