Sex Life ची सुखावह आठवण देणारे 'Love Bites' लपवण्यासाठी करा हे उपाय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Dangerr)

जेव्हा प्रेमीयुगुल खूप इंटीमेंट होतात किंबहुना प्रेमात आकंठ बुडालेले असतात तेव्हा त्यांच्याकडून कळत-नकळत पणे लव्हबाईट (Love Bites) दिला जातो. हे लव्हबाईट म्हणजे त्यांच्या गुलाबी प्रेमाची जणू साक्षच असतात. सेक्सदरम्यान (Sex) अनेकदा एक गोड आठवण म्हणून लव्ह बाईट दिला जातो. मात्र हे लव्हबाईट हे लोकांच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी म्हणजेच गळ्याजवळ असल्यामुळे आपली अनेकदा पंचाईत होते. बाहेर जाताना किंवा लोकांमध्ये वावरताना ते कसे लपवावे हा मोठा प्रश्नच असतो. अशावेळी बायका किंवा पुरुष पुर्ण गळ्याचे कपडे घालतात. बायका स्कार्फ, ओढणी किंवा केस मोकळे सोडून ते लपवण्याचा प्रयत्न करतात. पण इतके सगळे करुनही केव्हा ना केव्हा तरी ते लोकांच्या नजरेस पडतेच.

त्यामुळे आपल्यासमोर हे लव्हबाईट कसे लपवावे हे मोठे धर्मसंकटच असते. लोकांमध्ये आपल्या सेक्सलाईफ ला घेऊन चर्चा होऊ नये म्हणून नानाविध उपाय करत असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हे लव्हबाईट लपविण्यासाठी घरगुती आणि सोपे उपाय सांगणार आहोत. पाहा काय आहे हे उपाय:

1.आइसपॅक (Ice Pack)

लव्हबाईट घालवण्यासाठी त्या जागेवर आइसपॅक लावणे हा उत्तम उपाय आहे. थंडगार बर्फाचे तुकडे एका कापडात गुंडाळून ते कापड लव्हबाईट असलेल्या जागेवर लावा. 10 ते 15 मिनिटे त्या भागावर बर्फ फिरवल्यानंतर ते निशाण थोडे कमी होतात आणि ती जागा दुखत असेल तर तो त्रासही कमी होतो.

2. टूथब्रश (ToothBrush)

टूथब्रश हा देखील लव्हबाईट घालवण्यासाठी जालिम उपाय आहे. एक नरम टूथब्रश घ्या आणि प्रभावित जागेवर तो ब्रश हळूहळू फिरवा. त्या जागेवर ब्लड सर्क्युलेशन होऊन ते निशाण हळूहळू गायब होतील.

3. पेन्सिल खोडरबर (Pencil Eraser)

ऐकून धक्का बसला ना पण हे खरे आहे. लव्ह बाईटचे निशाण घालवण्यासाठी पेन्सिल इरेजर खूप कामी येतो. त्वचेच्या प्रभावित जागेवर हळू-हळू इरेजर फिरवल्यास ब्लड सर्क्युलेशन होते आणि लव्ह बाईट चे निशाण हळूहळू जातात.

4. कोरफड (Aloe Vera)

कोरफड त्वचेसंबंधींच्या ब-याच आजारांवर गुणकारी मानली जाते. कोरफडचे जेल (Alo Vera Gel) घेऊन ते लव्ह बाईट असलेल्या जागी लावून 15-20 मिनिटांनंतर ते धुवून टाका. व्रण कमी होतील.

5. निलगिरी तेल (Eucalyptus oil)

ऑलिव्ह ऑईल तेलामध्ये 2-3 थेंब निलगिरीचे तेल मिक्स करावे. हे मिश्रण संबंधित जागेवर लावल्यास त्या तेलातील अँटीऑक्साइड आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे लव्हबाईट कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा: Sex करताना महिलांच्या या 5 चुकांमुळे पुरुषांचा मूड होतो खराब

या घरगुती आणि सोप्या उपायांनी लव्ह बाईटचे निशाण अगदी सहजपणे घालवता येईल. त्यामुळे आता लव्ह बाईटचे निशाण लपविण्यासाठी तारेवरची कसरत न करता अगदी सोप्या उपायांनी ते घालवा.