Sex करताना महिलांच्या या 5 चुकांमुळे पुरुषांचा मूड होतो खराब
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (SEX) हा विषय वैवाहिक जीवनात पती आणि पत्नी च्या नात्यातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. जो आपले पुढील वैवाहिक जीवन कसे असेल ह्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे घराबाहेर असणा-या पती-पत्नींना ह्या गोष्टीचा समाधानकारक अनुभव घेता येत नाही. त्यामुळे आजकाल अनेक दाम्पत्यांमध्ये ताण-तणाव पाहायला मिळतात. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सेक्स ही भावना इतकी तीव्र असते, की त्यात जर आपल्या जोडीदाराकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास त्यांची घोर निराशा होते. ज्याचा परिणाम त्याच्या वैवाहिक जीवनावरही होतो. म्हणून आज आम्ही तुम्हाला त्या 5 महत्त्वाच्या चुका सांगणार आहोत, ज्या चुका महिलांनी सेक्स करताना न केल्यास त्याचे वैवाहिक आयुष्य देखील आनंदी आणि समाधानी होईल.

1. मूड नसण्याची कारणे सांगणे

दिवसभराच्या कामकाजातून थकलेल्या महिला ब-याचदा आपल्या पतीला सेक्स करण्याचा मूड नसल्याची कारणे देतात. जेव्हा पतीला आपल्या पत्नीसोबत बेडवर ते सुंदर क्षण सेक्समधून घालवायचे असतात तेव्हा अनेकदा महिला मूड नाही, पाळी आली आहे, दमली आहे अशी कारणे देतात. त्यामुळे पुरुषांची निराशा होते. आणि त्यांचा मूड क्षणार्धात खराब होतो.

2. सेक्स करण्यास स्वत:हून पुढाकार न घेणे

ब-याचदा पुरुषच सेक्स करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे एक नवरा म्हणून त्यांचीही अशी अपेक्षा असते की, कधी तरी पत्नीने ही याबाबतीत पुढाकार घ्यावा. त्यामुळे त्यांच्या अशा वागण्याने पुरुषांना असे वाटते सेक्स ही भावना फक्त आपल्यासाठी आपल्या पत्नीसाठी नाही. त्यामुळे तुमचे सेक्स लाईफ समाधानी करायचे असेल तर कधी कधी पत्नीने ही पुढाकार घेतला पाहिजे.

3. उत्साह कमी दाखवणे

सेक्स पती आणि पत्नी तेव्हाच एन्जॉय करु शकतात जेव्हा दोघे शारीरिक आणि मानसिकरित्या तयार असतील. ब-याचदा पुरुषच सेक्स दरम्यान उत्साह दाखवतात मात्र महिला आपला उत्साह व्यक्त करत नाही. कारण ब-याच महिलांचा असा समज असतो की आपण सेक्स दरम्यान जास्त उत्साह दाखवला तर आपला जोडीदार त्याचा चुकीचा अर्थ काढेल. मात्र तुमच्या ह्या व्यवहारामुळे तुम्ही केवळ एक औपचारिकता निभावत आहात बाकी काही नाही असा ही त्याचा अर्थ होऊ शकतो.

4. पती ला अनेक नियम आणि अटींमध्ये बांधून ठेवणे

सेक्स करतेवेळी अनेक महिला आपल्या पतीला खूप नियम आणि अटींमध्ये बांधून ठेवतात, ज्यामुळे न केवळ पुरुषांचा मूड खराब होतो, तर सेक्स लाईफवरही त्याचा विपरित परिणाम होतो. महिला अनेकदा आपल्या पतीला लाईट बंद करणे, वेळेवर लक्ष देणे यांसारखे बरेच नियम घालतात. महिलांच्या या नियमांमुळे पतीचा मूड खराब होतो आणि त्याचा सारा राग ते आपल्या पत्नीवर काढतात.

5. फोर प्ले न होणे

सेक्सचा सर्वोत्तम आनंद घ्यायचा असेल तर फोर प्ले होणे जरुरीचे आहे. कारण बरेच पुरुष सेक्स करायच्या आधी फोर प्ले एन्जॉय करतात. मात्र महिला या गोष्टीला एक प्रकारची कटकट आणि करायचे म्हणून करतात. त्यांना असं वाटते की, त्यांचा जोडीदार फोर प्ले मध्ये उगाच वेळ वाया घालवत आहे. तर काही महिलांना वाटते की, पती ने लवकरात लवकर सेक्स करण्याचे काम आटपून घ्यावे. त्याचा या व्यवहारामुळे पती खूप दु:खी होतात आणि त्यामुळे त्यांना फोर प्ले चा नीट आनंदही घेता येत नाही.

Oral Sex एन्जॉय करताना, स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी अशी घ्या आपल्या प्रायव्हेट पार्टसची काळजी

म्हणूनच तुमची सेक्स लाईफ खूप एन्टरेस्टिंग आणि समाधानी बनवायची असेल तर महिलांना या 5 चुका न केलेल्या कधीही चांगले. जेणे करुन तुमच्या जोडीदाराचा मूड खराब होणार नाही आणि तुम्ही त्यांच्या इच्छेचा, त्यांचा भावनांचा आदर करताय असे त्याला वाटेल. ज्याचे चांगले परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरही होतील.