Vagina cleanliness (Photo Credits: Unsplash)

उन्हाळा (Summer)  सुरु झाला की अगदी स्वस्थ बसून असतानाही घामाघूम व्हायला होतं, चारचौघात असताना चेहऱ्यावरील घाम तर निदान पुसण्याची तरी सोय असते पण प्रायव्हेट पार्टला येणाऱ्या घामाचं काय? बऱ्याचदा खूप घट्ट कपडे घातल्याने व्हजायना (Vagina)  च्या भागात खूप घाम येतो, यामुळेच पुढे या भागातील त्वचा काळी पडणे, खाज येणे, दुर्गंधी वैगरे अशाही समस्या उद्भवतात. याबाबत एक महत्वाची बाब अशी की प्रायव्हेट पार्टमध्ये घाम येण्याच्या ग्रंथी नसल्याने स्वतःच घाम येत नाही तर त्या आजूबाजूच्या त्वचेतील पेशींमुळे घाम येतो. त्यामुळे जर का तुम्हाला प्रायव्हेट पार्ट ला घाम येण्याची काळजी असेल तर त्याच्या आजूबाजूची त्वचा स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे. या लेखात आपण प्रायव्हेट पार्टला खूप घाम येण्याची कारणे आणि त्यावर उपाय म्ह्णून करायच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.  Vagina Cleaning: प्रायव्हेट पार्ट जवळील त्वचा काळी पडत असल्यास करा 'हे' घरगुती उपाय

प्रायव्हेट पार्ट ला घाम का येतो?

-अनेकदा या प्रायव्हेट पार्टच्या अवतीभोवती असणारे केस, म्हणजेच Pubic Hair हे घाम येणायचे मुख्य कारण असतात. या केसात घाम अडकून राहतो आणि त्यामुळे ओलावा जाणवू शकतो.

- अति व्यायाम हे देखील घाम येण्याचे कारण ठरू शकते.

- साधारणतः इनर वेअर घट्ट घालण्याकडे अनेक महिलांचा कल असतो. मात्र यामुळे प्रायटव्हेट पार्ट वरील त्वचेला पुरेशी हवा मिळत नाही त्यामुळे घाम येतो.

- मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या पॅड्समुळे किंवा घट्ट पॅन्ट साठी घातल्या जाणाऱ्या पॅंटी लायनर्समुळे सुद्धा त्वचेला श्वास घेता येत नाही.

- अति वजन असल्यास शरीराच्या सर्वच भागणार अति घाम येतो, त्यातही योनी भागात अधिक घाम जाणवतो.

प्रायव्हेट पार्ट ला जास्त घाम येऊ नये म्ह्णून काय करावे?

- सैल कपडे घाला. निदान ज्यातून त्वचेला मुबलक हवा मिळू शकेल असे कपडे निवडा.

- स्वच्छता बाळगा, शक्य असल्यास वेळच्या वेळी Pubic Hairचे ग्रूमिंग करा.

- केमिकलयुक्त साबण आणि लोशन लावू नका. ही त्वचा अधिक सेन्सेटिव्ह असते त्यामुळे या केमिकलचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

- कॉटन पॅड्स वापरल्यास उत्तम

- नवीन अंडरवेअर्स वापरण्यापूर्वी एकदा धुवून घ्या

- प्रायव्हेट पार्ट पुसताना पुढून मागे जा.

असं म्हणतात, घाम येणं ही खरंतर आरोग्याच्या दृष्टीने चांगली बाब मानली जाते, मात्र खूपच घाम येत असेल तर त्याचे कारण ओळखून वेळीच उपचार करणेही आवश्यक असते. अतिघामाने त्वचेचे रोग उद्भवू शकतात, त्यामुळे तुम्हालाही हा त्रास होत असेल तर त्याचे कारण आणि त्यावर नेमके काय उपाय आहेत हे माहीत करून घ्या.