दिवाळी फराळावर ताव मारण्यापूर्वी मधुमेहींनी 'या' टिप्स नक्की लक्षात ठेवा !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: ANI)

दिवाळीच्या उत्साहाला, जल्लोषाला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की गोडाधोडाचे पदार्थ आलेच. त्याचबरोबर तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही आणि मग मधुमेही व्यक्तींना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. दिवाळीचा फराळ हे दिवाळीचे अजून एक वैशिष्ट्य. नातेवाईक, मित्रमंडळींकडे गेल्यावर फराळ, गोड पदार्थांचा आग्रह मोडता येत नाही. दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !

त्याचबरोबर दिवाळीनिमित्त येणारे पाहुणे, पूजा या सर्व गडबडीत रोजचे वेळापत्रक बिघडते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. म्हणूनच  हिरानंदानी हॉस्पिटल आणि फोर्टिज नेटवर्क हॉस्पिटलमधील सल्लागार, एन्ड्रोक्रिनोलॉजिस्ट डॉ. तेजल लाठिया यांनी मधुमेहींसाठी खास टिप्स दिल्या आहेत. यामुळे मधुमेही देखील हेल्दी राहून दिवाळीचा आनंद लुटू शकतील.

काही महत्त्वाच्या समस्या

#  काही विशिष्ट सणांसाठी मधुमेही रूग्ण कडक उपवास करतात आणि ते दिवसभर पाणीही पीत नाहीत. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. आणि थेट संध्याकाळी जेवल्यानंतर रक्तशर्करेत (blood sugar) प्रचंड वाढ होते. डिहायड्रेशन आणि हायपरग्लायसेमिया (जास्त रक्तशर्करा) यांच्यामुळे चक्कर, थकवा, डोकेदुखी, गोंधळ उडणे असा त्रास होतो आणि कधीकधी व्यक्ती बेशुद्ध पडते किंवा कोमामध्ये जाते. फटाके फोडताना घ्या 'ही' काळजी ; साजरी करा safe दिवाळी

# सणांत नाच गाणे या गोष्टीही होतात. त्यामुळे आपल्याला वेळेचे भान राहत नाही. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होते. पाणी आणि जेवण कमी किंवा अजिबात न घेतल्यामुळे आपल्या शरीरातील शर्करा कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. तर अनेकदा सेलिब्रेशनमध्ये जास्त कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ आणि शीतपेये यांचे सेवन होते. त्यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण खूप वाढू शकते.

# सणांच्या काळात आपण नातेवाईकांना, मित्र आणि शेजाऱ्यांना भेटायला जातो. यामुळे यजमानांनी

बनवलेले खाद्यपदार्थ खाण्याकडे कल असतो. अशावेळी त्यांचा आग्रह मोडवत नाही आणि फराळ, गोड पदार्थ खाल्ले जातात. दिवाळीत फराळाला असा द्या हेल्दी ट्विस्ट !

आहार आणि व्यायामाचे वेळापत्रक सांभाळत आपण सणांचा आनंद घेऊ शकतो.

मधुमेहींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स....

- तुमच्या आहाराचे आगाऊ नियोजन करा : तुम्ही बाहेर जाणार असाल तर काय खायचे हे आधीच

ठरवा, काही दाणे किंवा फळे सोबत न्या.

- जेवण चुकवू नका : यामुळे तुमच्या रक्तशर्करा पातळीवर परिणाम होऊ शकतो.

- तुमच्या कॅलरी नियंत्रणात ठेवा : विशेषतः कार्बोहायड्रेट्सचे सेवन. महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही किती खाता. त्यावर लक्ष ठेवा. कमी प्रथिनयुक्त मांस आणि भाज्या खाणे हा चांगला पर्याय ठरेल.

- गोड पूर्णपणे बंद करू नका : तुमच्या आवडीच्या मिठाईचा तुकडा खाऊन तुम्ही तुमच्या कार्बोहायड्रेट सेवनाचे आगाऊ नियोजन करू शकता.

- भरपूर पाणी प्या : पाण्याची बाटली कायम सोबत असू द्या. ओरल ग्लुकोज जेल हाही एक चांगला

पर्याय आहे कारण त्यामुळे तुमची रक्तशर्करा कमी झाल्यावर ती वाढू शकेल.