Diwali 2018 :  फटाके फोडताना घ्या 'ही' काळजी ; साजरी करा safe दिवाळी
फटाके (Photo Credit : Pixabay)

दिवाळीचा सण हा झगमगाटाचा, आनंदाचा आणि रोषणाईचा असतो. परंतु, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आजारांचा आणि अपघातांचा धोका वाढवतात. फटाक्यांमुळे झालेले अपघात आपण पाहिले, ऐकले असतील. त्यामुळे दिवाळीच्या आनंदाला गालबोट लागू नये आणि दिवाळी अधिक सुरक्षित व्हावी म्हणून विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही खास टिप्स...

# नवीन कपडे घालणे हे दिवाळीतील एक खास आकर्षण असते. पण साडी, लेहंगा, लुंगी या सारखे कपडे घालून वावरताना विशेष काळजी घ्या. असे कपडे घालून फटाके उडवताना काळजी घ्या. फटाके उडवताना नायलॉन, पॉलिस्टर यापासून तयार केलेले कपडे घालू नका. दिवाळीच्या उत्साहात हेल्दी राहण्यासाठी खास '6' टिप्स !

# फटाक्यांच्या कानठळी बसवणार्‍या आवाजामुळे केवळ कानांचे नुकसान होते असे नव्हे तर हार्ट रेटही वाढतो. हृद्यविकाराचा त्रास असणार्‍यांमध्ये तसेच वृद्धांमध्ये हा त्रास अधिक जाणवतो. त्यामुळे इअरप्लगचा वापर करा. तुमच्या आसपासच्या परिसरात खूप फटाके उडवत असल्यास इअरप्लग वापरा.

# फर्स्ट एड बॉक्स घरात सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवा. तसेच त्यामध्ये आय ड्रॉप, भाजल्यानंतर लावली जाणारी क्रीम, इनहिलर्स अवश्य ठेवा. यामुळे एखादा अपघात झाल्यास काळजी घेणे तसेच तात्काळ उपचार करणे सोपे होते.

# फटाक्यांमुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी वाढते. त्यामुळे अ‍ॅन्टी पोल्युशन मास्क वापरा. यामुळे फुफ्फुसांचे आजार, अस्थमा, दम लागणे अशा समस्यांपासून तुमचा बचाव होतो. श्वसनाचा त्रास होत असल्यास या दिवसात मास्क घालूनच बाहेर पडा.

# दिवाळीच्या दिवसात सेलिब्रेशनच्या नावाखाली मद्यपान करू नका. अति प्रमाणात मद्य सेवन केल्यास डिहायड्रेशनचा, हॅगओव्हरचा त्रास होतो. यामुळे अपघाताचाही धोका वाढतो.

# त्याचबरोबर लहान मुलांना एकटे फटाके फोडण्यास सोडू नका. लहान मुलं फटाके फोडत असताना मोठी, जबाबदार व्यक्ती त्यांच्यासोबत असणे गरजेचे आहे. मुलांची दिवाळी सुट्टी सत्कारणी लावतील हे '5' पर्याय !

# फटाक्यांची क्रेझ लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच असते. पण लहान जागेत, गल्लीत, लहानशा बोळात फटाके फोडणे टाळा. त्यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी मोकळ्या जागेत फटाके उडवा आणि दिवाळीचा आनंद लूटा.