जेवणानंतर लगेचच या '5' गोष्टी करणे टाळा !
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Pixabay)

नाश्ता, जेवणात घेतलेले अन्नपदार्थ शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करतात. पण त्याचबरोबर आपण घेत असलेल्या अन्नपदार्थांमधून शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते का? यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

जेवणाच्या अचूक वेळा, खाण्या-पिण्याच्या योग्य सवयी यांसारख्या इतर अनेक गोष्टी शरीराला योग्य प्रमाणात पोषकघटक मिळण्यासाठी आवश्यक असतात. तुमच्या चुकीच्या सवयींचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. म्हणूनच जेवल्यानंतर लगेचच या गोष्टी करणे टाळा...

चहा पिणे

जेवल्यानंतर चहा पिण्याची अनेकांना सवय असते. पण तुमची हीच सवय आरोग्यास हानिकारक ठरु शकते. जेवल्यानंतर चहा घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. चहाच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात अॅसिड असल्याने अन्नपचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जर जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असल्यास जेवल्यानंतर एक-दोन तासांनी प्या. मात्र रात्रीच्या जेवणानंतर चहा पिणे टाळा.

धुम्रपान

धुम्रपान करणे आरोग्यास घातक असते, हे अनेकांना ठाऊक आहे. तरीही देखील तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असल्यास जेवल्यानंतर लगेचच सिग्रेट ओढणे टाळा. जेवल्यानंतर एक सिग्रेट ओढणे हे १० सिग्रेटमुळे होणाऱ्या नुकसानाइतके मोठे असते. त्यामुळे जेवणानंतर स्मोकिंग टाळलेलेच बरे.

फळं खाणे

ताजी फळे आरोग्यास फायदेशीर असतात, यात कोणतीही शंका नाही. पण जेवल्यानंतर फळे खाल्याने आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जेवल्यानंतर फळे खाल्याने फळातील पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे जेवणानंतर काही तासांनी किंवा सकाळीच्या वेळी फळे खाणे फायदेशीर ठरेल.

अंघोळ करणे

जेवल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तर जेवल्यानंतर रक्तप्रवाह पचनक्रियेसाठी पोटाच्या दिशेने होत असतो. अशावेळी जेवल्यानंतर लगेचच अंघोळ केल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि अन्न नीट पचले जात नाही.

झोपणे

झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवायला हवे. जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने अन्नपचन नीट होत नाही आणि अपचन, गॅसेस यांसारख्या समस्या उद्भवतात. झटपट अॅसिडीटी दूर करतील स्वयंपाकघरातील हे '५' पदार्थ !