
आजकालची बदललेली जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वेळा यामुळे आरोग्याचे गणित काहीसे बिघडते. परिणामी पोटाचे विकार, अॅसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवतात. तुम्हालाही हा त्रास वारंवार सतावतो का? मग अॅसिडीटीपासून सूटका मिळवण्यासाठी हे काही घरगुती उपाय करुन पहा...
बडीशेप
अधिकतर लोक बडीशेपचा माऊथ फ्रेशनर म्हणून वापर करतात. पण त्यात असलेल्या फ्लेवोनॉयड आणि प्लामेटिक अॅसिडमुळे बडीशेप एक प्रकारचे अॅंटी अल्सर देखील आहे. रात्री थोडीशी बडीशेप पाण्यात घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या. अॅसिडीटीपासून सुटका होईल.
लवंग
लवंग अॅसिडीटीपासून सुटका करुन देण्यास फायदेशीर ठरते. लवंग खाल्याने जी लाळ निर्माण होते त्याचा अन्न पचनास फायदा होतो. अॅसिडीटीसारखे वाटल्यास तोंडात लवंग घालून हळूहळू चघळा. असे केल्याने काही वेळात तुम्हाला आराम मिळेल.
वेलची
वेलचीत थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे अॅसिडीटीवर मिळवण्यासाठी याचा फायदा होतो. अॅसिडीटीवर आराम मिळवण्यासाठी दोन-तीन वेलची वाटून पाण्यात उकळवा. थंड करुन हे पाणी प्या.
पुदीना
अॅसिडीटीवर सुटका मिळवण्याचा पुदीना हा एक रामबाण उपाय आहे. यामुळे पोटाच्या इतर समस्या, अॅसिडीटीपासून सुटका होते.
तुळस
तुळस हा स्वयंपाकघरातील एक भाग नसला तरी प्रत्येकाच्या दारी असतेच आणि तुळशीचे महत्त्वही मोठे आहे. पोटात अॅसिडचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळशीची पाने उपयुक्त ठरतात. म्हणूनच जेवणानंतर तुळशीची पाने चघळा. यामुळे अॅसिडीटीची समस्या झटपट दूर होईल.