Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्रसह संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाबत सकारात्मक बदल दिसून न आल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने (Department of Public Health, Government of Maharashtra) ट्वीटरच्या माध्यमातून नागरिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला व प्रियजनांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? हे देखील सांगितले आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यावर नेमके काय केले पाहिजे? याचीही माहिती दिली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधातील लढ्यात महत्वाचा वाटा उचलत आहेत. मात्र, नागरिकांनाही स्वत:ची काळजी घेणे अधिक गरजेचे आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाबाधित व संशियत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांसाठी होम क्वॉरंटाइन गरजेचे आहे. तसेच ज्या लोकांना ताप, कोरडा खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे, अशा व्यक्तींनी त्वरित खबरदारी घ्यावी आणि हेल्पलाईन नंबर 104 टोल फ्री नंबरवर संपर्क साधावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटल पाठोपाठ आता राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृतदेहा शेजारी रूग्णावर उपचार होत असलेल्या प्रकाराचा व्हिडिओ केला ट्वीट

ट्वीट- 

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूचे जाळे दिवसेंदिवस संपूर्ण जगात पसरत चालले आहे. जगभरात 54 लाख 29 हजार 739 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैंकी 3 लाख 44 हजार 464 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 22 लाख 69 हजारर 873 जणांना कोरोनावर मात केली आहे.