मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांनी सायन हॉस्पिटल पाठोपाठ आता राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृतदेहा शेजारी रूग्णावर उपचार होत असलेल्या प्रकाराचा व्हिडिओ केला ट्वीट
Nitesh Rane tweets video of body bag placed next to patient | (Photo Credits: Twitter)

भाजप पक्षाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीटरवर आणखी एक खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मृतदेहाच्या शेजारी रुग्णांवर उपाचार होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी सुद्धा नितेश राणे यांनी अशाच प्रकारचे व्हिडिओ केईएम आणि सायन रुग्णालयातील पोस्ट केले असून दोन्ही रुग्णालये शासनाकडून चालवली जातात. या धक्कादायक व्हिडिओमुळे मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती.(मुंबई: केईएम रुग्णालयातील कोरोना बाधित मृतदेहांच्या शेजारी अन्य रुग्णांवर उपचार होत असलेल्या व्हिडिओवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे स्पष्टीकरण)

 ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या 140 सेंकदांची क्लिप नितेश राणे यांनी रविवारी ट्वीट करत पोस्ट केली आहे. त्यामध्ये एक मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये असून तो बेडवर ठेवण्यात आला आहे. या मृतदेहाच्या बाजूलाचा रुग्ण सुद्धा असल्याचे दिसून येत आहे. एक महिला मृतदेह ठेवलेल्या बेडच्या बाजूला बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओमधून नितेश राणे यांनी असा दावा केला आहे की, मुंबईतील राजावाडी रुग्णालयातील हा प्रकार असून हे रुग्णालय महापालिकेकडून चालवले जात आहे.('उद्धव व्हायरस' पेक्षा 'कोरोना व्हायरस'वर आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहणे चांगले; भाजप आमदार नितेश राणे यांचा ट्विटरवरुन टोला)

कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुंबईतील रुग्णालयातील बेड्स कमी पडत असल्याचे ही राणे यांनी व्हिडिओतून स्पष्ट केले आहे. परंतु महाराष्ट्र सरकाने आता खासगी रुग्णांलये सुद्धा कोरोनाबाधित रुग्णांसाठी द्यावीत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची तेथे व्यवस्था करण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे की, एक लाख पर्यंत त्याची सोय करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 47,190 वर पोहचला आहे. त्यापैकी मुंबईतील बहुतांश रुग्ण असून तेथे आकडा 28 हजारांवर गेला आहे. तसेच 1557 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात आले आहे.