'उद्धव व्हायरस' पेक्षा 'कोरोना व्हायरस'वर आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहणे चांगले; भाजप आमदार नितेश राणे यांचा ट्विटरवरुन टोला
Uddhav Thackeray & Nitesh Rane (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) साधारणपणे रोजच जनतेशी संवाद साधत आहेत. त्यामुळे नागरिकांना सद्य परिस्थितीची पूर्ण माहिती मिळते आणि विनाकारण गोंधळ उडत नाही. मात्र कोरोना व्हायरसची सामना करण्यासाठी सतर्क असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर  भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे. (Coronavirus चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राम कदम, पंकजा मुंडे या राजकीय नेत्यांचा Lockdown चा सल्ला)

शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांना टोला लगावला आहे. "रोज सकाळी संजय राऊत यांची उद्धव व्हायरस वर होणारी पत्रकार परिषद पाहण्यापेक्षा कोरोना व्हायरसवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पाहणे केव्हाही चांगले," अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

नितेश राणे ट्विट:

कोरोना व्हायरसचे जागतिक संकट थोपवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारसह राज्य सरकारही करत आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना सर्व पक्ष, नेते एकत्रितपणे करत असल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळत होते. यात सुदैवाने कोणतेही आरोप-प्रत्यारोप होत नव्हते. मात्र नितेश राणे यांनी या संकटातही टीकेचे शस्त्र उगारले आहे.