मुंबई: केईएम रुग्णालयातील कोरोना बाधित मृतदेहांच्या शेजारी अन्य रुग्णांवर उपचार होत असलेल्या व्हिडिओवर शिवसेना खासदार अनिल देसाई यांचे स्पष्टीकरण
Anil Desai And KEM Hospital (Photo Credits: Twitter/ANI)

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध मोठी लढाई लढत असताना दिवसागणिक राज्यात कोरोना बाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईतील केईएम रुग्णालयातील रुग्णांची अवस्था दाखवणारा व्हिडिओ भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शेअर केला होता. यात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बाजूला प्लॅस्टिक बॅग असलेले शव दिसत होते. मात्र यावर केईम रुग्णालयाकडून कोणतहेी उत्तर आले नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे. मात्र आज शिवसेना खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'हा प्रकार त्यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे झाला असावा. काही वेळानंतर लगेचच त्यात सुधारणा करण्यात आली असे अनिल देसाई यांनी सांगितले आहे.

'तसेच त्या रुग्णालयातील सर्व अधिकारी कार्यक्षमतेने काम करत आहेत. त्यामुळे कोणालाही बदनाम करण्याची गरज नाही', असे अनिल देसाई यांनी सांगितले. Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सहित तुमच्या जिल्ह्यात किती COVID19 रुग्ण आहेत, पहा

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 1,278 नवे रुग्ण आढळले आहेत तसेच 53 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा (Coronavirus Patients In Maharashtra) एकूण आकडा हा 22,171 इतका झाला आहे तर आजवर कोरोनाने 832 बळी घेतले आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांना कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला आहे तर आज बुलढाणा जिल्हा हा पूर्णतः कोरोनमुक्त होऊन ग्रीन झोन मध्ये गेला आहे.