Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 1,278 नवे रुग्ण आढळले आहेत तसेच 53 नव्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा (Coronavirus In Maharashtra) एकूण आकडा हा 22,171 इतका झाला आहे तर आजवर कोरोनाने 832 बळी घेतले आहेत. याबाबत महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा मुंबई शहराला बसला आहे. कालच्या दिवसभरात मुंबई मध्ये नव्या 875 नव्या रुग्णांची भर पडल्याने मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजार 564 वर पोहचला आहे. तर पुणे शहराचा कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या यादीत दुसरा क्रमांक असून संपूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोनाचे आज घडीला 2830 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत यापैकी 938 रुग्ण बरे झाले आहेत तर कोरोनाबाधित 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणाऱ्या अन्य जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या (Last Updated 10th May 10pm) जाणून घ्या.

महाराष्ट्रात आजपर्यंत 2.38,766 कोरोना चाचण्या झाल्या असून या नमुन्यांपैकी 2,15, 903 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 22, 171 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2, 44, 327 लोक होम क्वारंटाईन असून 14, 465 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. अशी माहिती काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार राज्याचे तीन वेगळ्या झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. यानुसार तुम्ही राहत असणारा जिल्हा हा रेड, ग्रीन, ऑरेंज झोन पैकी नेमका कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी:

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 13, 739 508
2 ठाणे 121 2
3 ठाणे मनपा 880 8
4 नवी मुंबई मनपा 826 4
5 कल्याण डोंबिवली मनपा 351 3
6 उल्हासनगर मनपा 26 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 30 2
8 मीरा भाईंदर 214 2
9 पालघर 34 2
10 वसई विरार मनपा 229 10
11 रायगड 92 1
12 पनवेल मनपा 138 2
ठाणे मंडळ एकूण 16, 680 544
1 नाशिक 59 0
2 नाशिक मनपा 38 0
3 मालेगाव मनपा 562 34
4 अहमदनगर 54 3
5 अहमदनगर मनपा 9 0
6 धुळे 9 3
7 धुळे मनपा 45 3
8 जळगाव 144 12
9 जळगाव मनपा 34 7
10 नंदुरबार 22 2
नाशिक मंडळ एकूण 976 64 
1 पुणे 162 5
2 पुणे मनपा 2377 146
3 पिंप्री-चिंचवड मनपा 140 4
4 सोलापूर 9 0
5 सोलापूर मनपा 241 11
6 सातारा 191 2
पुणे मंडळ एकुण 3048  168
1 कोल्हापूर 13 1
2 कोल्हापूर मनपा 6 0
3 सांगली 33 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 4 1
5 सिंधुदुर्ग 6 0
6 रत्नागिरी 36 1
कोल्हापूर मंडळ एकुण 98 3
1 औरंगाबाद 93 0
2 औरंगाबाद मनपा 475 13
3 जालना 12 0
4 हिंगोली 59 0
5 परभणी 1 1
6 परभणी मनपा 1 0
औरंगाबाद मंडळ एकूण 641 14
1 लातूर 25 1
2 लातूर मनपा 1 0
3 उस्मानाबाद 3 0
4 बीड 1 0
5 नांदेड 4 0
6 नांदेड मनपा 39 3
लातूर मंडळ एकूण 73 4
1 अकोला 17 1
2 अकोला मनपा 142 10
3 अमरावती 4 1
4 अमवरावती मनपा 78 11
5 यवतमाळ 96 0
6 बुलढाणा 24 1
7 वाशीम 1 0
अकोला मंडळ एकूण 362 24
1 नागपूर 2 0
2 नागपूर मनपा 249 2
3 वर्धा 0 0
4 भंडारा 1 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 1 0
7 चंद्रपूर मनपा 3 0
8 गडचिरोली 0 0
नागपूर मंडळ एकूण 257 2
1 इतर राज्य 36 9
एकूण 22,171  832

दरम्यान, देशातील कोरोना रुग्णांची संख्या सुद्धा आज पुन्हा वाढली आहे.देशात सद्य घडीला 67, 152 संक्रमित रुग्ण असून यापैकी 44, 029 जणांवर उपचार सुरू आहेत. 2206 जणांचा कोरोनाच्या लढाईत बळी गेला आहे तर 20, 917 जणांनी ही लढाई यशस्वीरीत्या पार केली आहे.