सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून या काळात सारखी तहान लागते. तसेच घश्याला कोरड पडण्यासाठी आपण वारंवार पाणी पितो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखण्यासाठी पाणी भरपूर प्रमाणात पिणे उत्तम मानले जाते. त्याचसोबत जर तुम्ही अगदीच गरम हवामानात भरपूर वेळ राहिल्यास तुम्हाला हिट स्ट्रोकची समस्या जाणवू शकते. हिट स्ट्रोकमध्ये शरीराचे तापमान 104F किंवा त्यापेक्षा अधिक होते. या हिट स्ट्रोकमुळे तुम्हाला काही समस्या सुद्धा उद्भवू शकतात. तापमान जसे जसे वाढते तसे शरीराच्या तापमानात सुद्धा बदलाव होतो. हिट स्ट्रोकमध्ये घाम येत नाही. परंतु सामान्य परिस्थितीत गरम होते पण शरीराचे तापमान वाढत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात फळ आणि भाज्या शरिराला हायड्रेट करण्यासाठी मदत करतात. त्यामध्ये जर तुम्ही टरबूज, काकडी, खीरा, पुदीना, दुधी, मोड आलेली कडधान्ये किंवा लिंबू सरबत यांचा समावेश केल्यास शरिराला आराम मिळेल. परंतु या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त तुम्हाला जर हिट स्ट्रोक पासून उन्हाळ्यात बचाव करायचा असल्यास या सुद्धा गोष्टी तुम्ही खाऊ शकता. जेणेकरुन ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.(Summer Tips: उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या)
>>नारळ पाणी
उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्यासाठी आपण साधे पाणी नेहमीच पितो. परंतु जर तुम्ही नारळ पाण्याचे सेवन सुद्धा केले तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण नारळ पाणी प्यायल्याने आपले इलेक्ट्रोलाइट्स संतुलित राहून हिट स्ट्रोक पासून बचाव करण्यास मदत होते.
>>गुलकंद
उन्हाळ्यात जर तुम्हाला गरमीमुळे नाकातून रक्त येण्याची समस्या जाणवत असल्यास 1 चमचा गुलकंद दूध किंवा गुलकंद शेक सोबत प्या. त्यामुळे शरिरातीच्या आतमधील तापमान नियंत्रित राहण्यास मदत होईल. तसेच पोटातील गरमी आणि शरीराचे मुख्य तापमान सुद्धा कमी करते. हिट स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी दिवसातून एकदा तरी गुलकंदचाचे सेवन करावे.
>>कैरीच पन्हं
गरमीच्या दिवसात कच्ची कैरी खाल्ल्याने आपल्या शरीराला हायड्रेट राहण्यास मदत करते. परंतु कच्ची कैरीखाण्याऐवजी त्याचे पन्हं प्यायल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. शरिराचे वाढलेले तापमान पन्ह प्यायल्यास नियंत्रणात येण्यासोबत इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा संतुलित राहण्यासाठी महत्वपूर्ण आहे.(Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत)
तर वरील काही गोष्टी खाण्यासोबत उन्हाळ्यात त्वचेची सुद्धा काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना चेहरा आणि डोक झाका. तसेच त्वचा काळवंडू नये यासाठी सनस्क्रिन लोशन लावण्यास विसरु नका.