Summer Tips: उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: Olichel/Pixabay)

गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो असे म्हटले जाते. कारण आरोग्य आणि फिटनेट्स एक्सपर्ट नेहमीच आपल्याला गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. गरम पाणी प्यायल्याने चयापचय वेगाने होत असून वजन कमी करण्याची इच्छा असणारे लोक याचा डेली लाईफमध्ये समावेश करतात. थंडीच्या दिवसात गरम पाणी प्यायल्याने बरे वाटून कोणत्या समस्या सुद्धा उद्भवत नाहीत. परंतु उन्हाळ्यात गरम पाणी प्यायल्याने थोडी समस्या येऊ शकते. परंतु खरंच उन्हाळ्यात गरम पाणी पिणे योग्य की अयोग्य? उन्हाळ्याच्या दिवसात गरम पाणी पिण्याचे नुकसान आणि फायदे सुद्धा आहेत? तर याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख जरुर वाचा.(Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत)

>> गरम पाणी पिण्याचे फायदे:

- गरम पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते

-एका रिसर्चच्या मते, गरम पाणी प्यायल्याने चयापचयाची क्रिया वेगाने होते. त्यामुळे शरीरीतील फॅट अधिक बर्न झाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. सकाळी उठून उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्यास सुद्धा लठ्ठपणा कमी होऊ शकतो.

-गरम पाणी प्यायल्याने रक्त पुरवठा सुरळीत राहत असून धमन्यांना आराम मिळतो.

-सर्दी, खोकला झाल्यास गरम पाणी पिणे उत्तम मानले जाते.

>>उन्हाळ्यात गरम पाणी पिणे सुरक्षित आहे का?

गरम पाणी पिण्याचे फायदे वाचून तुम्हाला सुद्धा ते रोज प्यायावे असे वाटत असेल. परंतु उन्हाळ्यात गरम पाणी पिणे खरंच सुरक्षित आहे का? उन्हाळ्यात तुम्ही जर एसीचा वापर करत नसल्यास तुमच्या शरीराते तापमान अधिक असते. अशातच जर तुम्ही गरम पाणी प्यायलात तर घाम येऊन शरीराचे तापमान अधिक वाढू शकते. शरीराला आलेला घाम तुम्हाला नकोसा वाटून तुमची चिडचिड होऊ शकते. परंतु विज्ञानानुसार, शरीरातून घाम निघणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.(Summer Health Tips: उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या) 

>>उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे नुकसान

सर्व प्रथम लक्षात असू द्या की, गरम पाणी तुम्हाला कोणत्याही आजारापासून वचवू शकत नाही. परंतु तुमच्या शरीराला बूस्ट करण्यास मदत करते. त्यामुळे गरम पाणी आजारावर फायदेशीर ठरते असे प्रत्येक वेळी मानणे चुकीचे आहे. पाणी अधिक गरम असल्यास पोटात सुद्धा गरमा वाढतो. त्यामुळे तोंड येणे, पोटदुखी आणि अपचन अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पाणी अगदीच गरम न पिता ते कोमट असल्यास प्यायावे.

थंड पाणी आरोग्यासाठी हानिकाराक मानले जाते. त्यामुळे थंड पाणी पिण्याऐवजी तुम्ही सामान्य तापमान असलेले पाणी प्यायल्यास उत्तम ठरेल. उन्हाळ्यात काही जणांना गरम पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो. अशातच जर तुम्ही गरम पाणी प्यायल्यास उलटी सुद्धा होऊ शकते. आरोग्याच्या फायद्यासाठी गरम पाणी पिणे उत्तम पण त्याचा तापमाना नुसार वापर करावा. तसेच जर तुम्ही उन्हात कुठे बाहेर जाणार असल्यास त्यावेळी गरम पाणी पिऊ नका. कारण त्यामुळे हीट स्ट्रोकची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे गरम पाण्याचे सेवन जेव्हा तुम्ही घरी आल्यानंतर निवांत बसल्यानंतर सेवन करा.