Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे पिण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या पन्हे बनविण्याची योग्य पद्धत
उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला थंडगार पेयाची आवश्यकता असते. हे पेय पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. यातील कैरीच्या पन्ह्याचा शरीराला जास्तीत-जास्त फायदा होतो.
Summer Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला थंडगार पेयाची आवश्यकता असते. हे पेय पिल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कैरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, विटामिन्स आणि मिनरल्स यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. यातील कैरीच्या पन्ह्याचा शरीराला जास्तीत-जास्त फायदा होतो.
कैरीचं पन्ह्याचा स्वाद आंबट गोड असतो. लहान मुलांना कैरी तसेच कैरीच्या पन्ह्याची चव जास्तचं आवडते. आजही ग्रामीण भागात कैरीचे पन्हे बनवले जाते. उन्हाळ्यात हमकास बनवली जाणारी ही रेसिपी अतिशय गुणकारी ठरते. आज या लेखातून आपण कैरीच्या पन्ह्याचे आरोग्यदायी फायदे आणि पन्हे बनवण्याची पद्धत जाणून घेणार आहोत. (हेही वाचा - Health Benefits of Jamun: मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांवर गुणकारी आहे जांभूळ, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे)
मधुमेही रूग्णांसाठी गुणकारी -
कैरीच्या पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण असते. उन्हाळ्याच्या दिवसात पन्ह्याचे सेवन केल्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही. यात लॉ ग्लाईसेमिक इंडेक्स असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
कॅन्सरपासून बचाव -
कैरीमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. यात अँटिऑक्सिडंट्स असतात. कैरीच्या पन्ह्यामुळे आतड्याचा कॅन्सर आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका टाळतो.
डोळ्यांसाठी फायदेशीर -
कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन ए असते. त्यामुळे डोळयांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कैरीचे पन्हे प्यायल्याने डोळे निरोगी राहतात तसेच दृष्टीदोष कमी होतो.
हिरड्या निरोगी राहतात -
कैरीच्या पन्ह्यामध्ये विटामिन सी असते. यातील पोटॅशियम आणि कॅल्शियम दात आणि हिरड्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
बद्धकोष्ठापासून संरक्षण -
कैरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्याने पोट साफ राहण्यास मदत होते.
प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत -
कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कैरीच्या पन्ह्यात विटामिन सी, विटामिन बी6, विटामिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट्स घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून सुटका मिळते.
त्वचेवर सुरकुत्या कमी होतात -
कैरीचे पन्हे पिल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. पन्ह्यामधील विटामिन सी आणि ए ही पोषक तत्वे त्वचेला अधिक चमकदार बनवतात.
डिहायड्रेशनपासून सुटका -
उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने डिहायड्रेशनपासून सुटका होते. याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो.
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
2-3 कैऱ्या
2 चमचे काळे मीठ
2 चमचे जिरे पावडर
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
15-20 पुदीना पाने
100 - 150 ग्रॅम साखर
कैरीचे पन्हे बनविण्याची पद्धत -
सर्वात अगोदर कैरी उकडून घ्या. त्यानंतर त्याची कोय काढून टाका. उकडलेल्या कैरीचा रस काढून घ्या. त्यात साखर, काळे मीठ, पुदीना घालून मिक्सरमधून वाटा. हे सर्व मिश्रण गाळून घ्या. यात काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर घाला आणि त्यात थोड पाणी मिक्स करा. अशा पद्धतीने तुम्ही कैरीचे पन्हे बनवू शकता.
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2020 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

