Summer Health Advisory: देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची उष्णता जाणवत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत. अशात केंद्र सरकारने लोकांना खाण्या-पिण्याबाबत ॲडव्हायजरी जारी केली आहे. सरकारने लोकांना उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेत चहा आणि कॉफी पिणे टाळण्यास सांगितले. तसेच दारू पिण्यापासून दूर राहा. याशिवाय कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड ड्रिंक्स) पिणेही टाळावे, असे सांगितले आहे. सरकारच्या ॲडव्हायझरीमध्ये असे म्हटले आहे की, ही पेये प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थ जास्त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात.
उच्च प्रथिनेयुक्त अन्न खाऊ नका असेही यामध्ये म्हटले आहे. यासह पुढे स्ट्रीट फूड खाणे टाळावे. घरी जेवण बनवताना दारे आणि खिडक्या उघड्या ठेवा, असे यात नमूद केले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) नुसार, उष्माघाताचा प्रभाव टाळण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत सूर्यप्रकाशात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे, या काळात पांढऱ्या रंगाची सुती कपडे परिधान करण्यास सांगण्यात आले आहे.
Stay cool and protected from the #HeatWave☀️
Here are some essential measures to keep you comfortable during scorching heat!#BeatTheHeat @MoHFW_INDIA @ndmaindia @MIB_India pic.twitter.com/MyIobDOgOP
— PIB India (@PIB_India) April 16, 2024
उष्माघातापासून बचाव-
जाणून घ्या काय करावे-
या काळात हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे.
भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.
पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा.
भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय सोबत घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
शक्यतो तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. (हेही वाचा: Bird Flu Outbreak: 'कच्चे दूध पिऊ नका, पुरेशा तापमानात मांसाहार शिजवा', बर्ड फ्लूबाबत केंद्राचा सल्ला)
जाणून घ्या काय करू नये-
रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये. उन्हात अधिक वेळ राहू नये. तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये.
ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवावी. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नये.
उन्हात विशेषतः दुपारी 12:00 ते 03:00 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावीत. अनवाणी बाहेर जाऊ नये.
पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये. वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते.