
India Weather: जून ते ऑगस्ट दरम्यान भारतातील तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त राहिले. क्लायमेट सेंट्रलच्या एका अहवालानुसार, जून ते ऑगस्ट या तिमाहीत 1970 नंतर सर्वात जास्त उष्णता (Heatwave)अनुभवली गेली. या काळात, देशाच्या एक तृतीयांश लोकसंख्येला सात दिवस अतिउष्णतेचा सामना करावा लागला. क्लायमेट सेंट्रलच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या तीन महिन्यांतील 29 दिवस तापमान सामान्यपेक्षा तीन पटीने जास्त (Temperature)राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.
1970 नंतरचे सर्वात उष्ण तिमाहीचे तापमान
अहवालात म्हटले आहे की जून ते ऑगस्ट 2024 ही 1970 नंतरची दुसरी सर्वात उष्ण तिमाही होती. अहवालानुसार, भारतातील दोन कोटींहून अधिक लोकांना किमान 60 दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. जागतिक स्तरावर, दोन अब्ज लोकांना 30 दिवस किंवा त्याहून अधिक धोकादायक उष्णतेचा सामना करावा लागला. हे तापमान सर्वसामान्य प्रमाणापेक्षा तिप्पट होते. तिरुअनंतपुरम, वसई-विरार, कावरत्ती, ठाणे, मुंबई आणि पोर्ट ब्लेअर या शहरांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला, असे अहवालात सांगण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसात वाढ
अहवालानुसार, मुंबईला जून ते ऑगस्ट दरम्यान 54 दिवस तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. दिल्ली आणि कानपूरसारख्या शहरांमध्ये ही संख्या जास्त होती. या काळात सरासरी तापमान 39 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. उच्च तापमानाचा जगभरातील अब्जावधी लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. क्लायमेट अँड सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हचे कार्यकारी संचालक वैभव प्रताप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, हवामान बदलाचा परिणाम स्पष्टपणे लोकांच्या आरोग्यावर आणि व्यवसायावर होताना दिसत आहे. दरवर्षी पूर, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे.
जानेवारी-ऑगस्ट कालावधीतील तापमान 1991-2020 च्या तापमानापेक्षा 0.70 अंश सेल्सिअसने जासत्त नोंदवले गेले. असा दावा केला जात आहे की 2024 हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष आहे. या उन्हाळ्यात भारतात 536 दिवस उष्णतेची लाट अनुभवली गेली. जे 14 वर्षांतील सर्वात जास्त तापमान होते. भारतीय हवामान विभागाच्या मते, देशाच्या वायव्य भागात 1901 नंतरचा जून महिना सर्वात उष्ण होता. जूनमध्ये देशात 181 उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले गेले, जे 2010 नंतरचे सर्वाधिक होते.