Sleep Tips: रात्रीच्या वेळी झोप येत नाही? फॉलो करा 'या' सोप्प्या टीप्स
शांत झोप photo credits: PIxabay

Sleep Tips: तणाव आणि लाइफस्टाइल संबंधित सवयींमुळे बहुतांश लोकांना झोपेची समस्या जाणवते. अशातच काही जण औषध सुद्धा घेतात. मात्र याचा परिणाम आरोग्यावर होतो. झोप न येण्याची समस्येच्या कारणामुळे क्रॉनिक स्थिती निर्माण होते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर आयुर्वेदात सांगितलेल्या काही नियम तुम्ही फॉलो करु शकता. यामुळे तुमचा स्लिपींग पॅटर्न व्यवस्थिती होऊन नीट झोप लागू शकते.

रात्रीच्या वेळी झोप लागत नसेल तर शरिराला मसाज करण्याची सवय लावून घ्या. पण जर संपूर्ण शरीराला मसाज करणे शक्य नसल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेस पॉइंट्सवर मसाज करा. कपाळ आणि खांद्यावर हलके गरम तिळाचे तेल लावा. यामुळे मासपेशींना आराम मिळेल आणि उत्तम झोप लागण्यास मदत होईल.(Health insurance: हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? आरोग्य विमा का आवश्यक असतो?)

त्याचसोबत दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टिस करा. यासाठी प्रथम तुम्ही ओमचा जप करत श्वास आतमध्ये घ्या आणि नाक-तोंडाद्वारे तो बाहेर सोडा. ओम शब्दाचा मनावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे तुम्हाला हलके आणि थोडे तणावमुक्त वाटत शांत झोप लागेल.(Kegel Exercise: कीगल एक्सरसाइज कशी करावी? व्हिडिओमध्ये पहा स्टेप्स आणि हा व्यायाम करण्याची योग्य पद्धत)

आयुर्वेदानुसार रात्रीच्या वेळेस अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायम करा. झोपण्यापूर्वी प्राणायम केल्यास रक्ताचा पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे शरिराला ऑक्सिजन सुद्धा पुरेशा प्रमाणात मिळते. प्राणायम केल्याने डोक शांत राहते आणि झोप ही लागते.